Viral Video: सोशल मीडियावर अनेक गोष्टी सतत व्हायरल होत असतात, ज्यातील काही आपले मनोरंजन करतात तर काही व्हिडीओंमध्ये अनेक व्हायरल होणाऱ्या सत्य घटना आपल्याला पाहायला मिळतात. या घटनांपैकी काही घटना अशा असतात, ज्या पाहून आपल्या पायाखालची जमीन सरकते. ज्यात कधी अपघाताचे तर कधी मारहाणीच्या व्हिडीओंचाही समावेश असतो. सध्या अशाच एका मारहाणीचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
नातं कुठलंही असो, पण त्यामध्ये रागावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. परंतु, अनेक जण रागात समोरच्या व्यक्तीवर हात उचलतात, ज्यामुळे नातं अधिक कमकुवत होतं. सोशल मीडियावर कधी पालकांना, मुलांना मारहाण केल्याचे किंवा पती-पत्नीमध्ये झालेल्या मारहाणीचे व्हिडीओ तुम्ही अनेकदा पाहिले असतील. आता समोर आलेल्या व्हिडीओतील एक वृद्ध व्यक्ती त्याच्या पत्नीला शेतामध्ये कुदळीने माराहाण करताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका वृद्ध जोडप्यामध्ये कोणत्यातरी कारणावरून शेतामध्ये काम करत असताना वाद सुरू होतो, ज्यावर चिडून वृद्ध पती त्याच्या पत्नीला हातातील कुदळीने मारहाण करतो. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @agricalture_wishw या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला चार लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाईक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “कुठं फेडशील हे पाप, आदर करायला शिक, स्त्री ही घरची लक्ष्मी असते”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “नरकात जागा भेटणार नाही त्या म्हातार्याला..” तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “व्हिडीओ काढणाऱ्याला कुत्र्यासारखं मारलं पाहिजे, तिला वाचवायचं सोडून व्हिडीओ काढतोय”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “ती बाई आहे, तुझी हमाल नाही.”