पाळीव प्राणी म्हणजे अनेकांसाठी आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट असते. घरातील सदस्याप्रमाणेच या पाळीव प्राण्यांची काळजी घेतली जाते, त्यांच्यावर प्रेम केले जाते. हे प्राणी देखील घरातील सर्व सदस्यांना जीव लावतात, त्यांची काळजी घेतात, त्यांच्यावर काही संकट ओढावले तर लगेच मदतीसाठी धाव घेतात अशी बरीच उदाहरणं तुम्ही पाहिली असतील. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतून एका व्यक्तीचे प्राणीप्रेम स्पष्ट होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये प्रवासादरम्यान एका माणसाच्या बॅगेत विचित्र गोष्ट आढळल्याने, तेथील एका प्रवाशाने हा व्हिडीओ शूट केला असण्याची शक्यता आहे. व्हिडीओ पाहताना या बॅगेत कुत्र्याचे पिल्लू असल्याचे समजते. बॅगेत कुत्र्याचे पिल्लू घेऊन जाणाऱ्या या माणसाने कुत्र्याला श्वास घेण्यात अडचण येऊ नये यासाठी बॅगेची चैन थोडी उघडी ठेवली आहे. तसेच एका हाताने त्याने पिल्लाला धरल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवरून या व्यक्तीचे प्राणीप्रेम स्पष्ट होत आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा: मित्र असावा तर असा! कुत्र्याने चिमुकल्यावर हल्ला करताच ‘त्याने’ घेतली धाव; थक्क करणारा Viral Video एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा: ट्रेकिंग करताना उंचावरून तोल गेला अन्…; थक्क करणारा Viral Video एकदा पाहाच

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली असुन, या व्यक्तीचे प्राणीप्रेम पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये त्याची प्रशंसा केली आहे. या व्हिडीओला २९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video man carrying puppy in backpack during train journey wins internet pns