सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली बिल्डिंगवरून खाली पडताना दिसतेय. पहिला दुसरा मजल्यावरून नव्हे तर पाचव्या मजल्यावरुन ही चिमुकली खाली पडली. पाचव्या मजल्यावरून खाली पडणं म्हणजे जीव वाचेल याची गॅरेंटीच नाही.पण, या चिमुकलीचं नशीब बलवत्तर. पाचव्या मजल्यावरून पडली तरी ही चिमुकली एकदम ठणठणीत. यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे प्रत्यक्षात घडलंय. एवढ्या उंचावरून ही चिमुकली पडल्यामुळं सगळ्याच जणांचा श्वास रोखून होता. पण चिमुकली जिवंत असल्याचं पाहून कुठे तरी जीवात जीव येतो. नक्की असा कोणता चमत्कार घडला, हे जाणून घेण्यासाठीची तुमची उत्सुकता वाढली असेल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, साधारण दोन वर्षाची मुलगी उंच इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील खिडकीला लटकताना दिसतेय. बॅकग्राऊंडमध्ये जोरजोरात ओरडण्याचा देखील आवाज येतोय. काही सेकंद ही मुलगी खिडकीलाच लटकत असलेली पाहून मनात धडकी भरते. तितक्यात ही मुलगी खिडकीतून खाली कोसळते. इतक्या उंचावरून खाली पडल्यानंतर आता तीचं काय होईल अशी भीती मनात येत असतानाच पुढे जे दृश्य दिसतं ते पाहून आश्चर्याचा धक्का बसेल. म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी? या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव या व्हिडीओमधून मिळतो.

आणखी वाचा : उंदीर आणि कबुतराची लढाई तुम्ही कधी पाहिलीय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

एक व्यक्ती इमारतीच्या खाली फोनवर बोलत होता. त्याच्यासोबत एक महिला देखील दिसतेय. अचानक दोघांची नजर वर जाते आणि मुलीला इमारतीवरून खाली पडताना पाहून ते दोघंही वर पाहत तिला झेलण्यासाठी पुढे धावत जातात. या नादात धावता धावता त्याचा पाय देखील घसरतो. पण तो वेळीच स्वतःचा सावरतो आणि मुलीला झेलण्यासाठी पुढे येतो. काही सेकंदात ही मुलगी त्याच्या हातात येऊन पडते. अगदी देवदूत बनून हा व्यक्ती मुलीचा जीव वाचवतो.

आणखी वाचा : ‘पुन्हा खोड काढलीस तर याद राख’; चिडलेल्या माकडाने मुलीला अशी घडवली अद्दल, पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : रूबाब! वाघ रस्ता ओलांडत असल्याने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने सर्व गाड्या थांबवल्या; चंद्रपूरमधला VIDEO VIRAL

ही घटना चीनमधल्या झेजियांग प्रांतात घडली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुलीचा जीव वाचवणाऱ्या या व्यक्तीचं नाव शेन डोंग असून तो बिल्डिंगखाली रस्त्यावर आपली कार पार्क करत होता. त्याचवेळी या मुलीला त्याने खिडकीतून पडताना पाहिलं आणि त्याने तिला वाचवलं. चीनमधील सरकारी अधिकारी लिजियान झाओ यांनी सुद्धा आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर तो बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल देखील झालाय. या व्हिडीओला आतापर्यंत १ लाख ५३ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर साडेआठ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.