जंगल सफारी दरम्यानचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. असे बरेच व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. यातील काही व्हिडीओंमध्ये थक्क करणाऱ्या घटना कॅमेऱ्यात कैद होतात, तर काहीवेळा स्वतःच्याच चुकीमुळे काही माणसं संकटात सापडलेले तुम्ही पाहिले असतील. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल होणारा हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती वाघाचा फोटो काढण्यासाठी वाघाच्या दिशेने चालत असलेला दिसत आहे, वाघ अगदी काही पावलांच्या अंतरावर असुनही हा माणूस त्याच्या दिशेने चालतच राहतो. फक्त फोटोसाठी इतका मोठा धोका पत्करणे अत्यंत चुकीचे आहे, असा विचार हा व्हिडीओ पाहताना आपल्या मनात येतो. पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ.

आणखी वाचा- Video: पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न करताना घडली जन्माची अद्दल; नेमकं काय झालं पाहा

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा- Video: सिंहाजवळ गेला अन् घडली जन्माची अद्दल; नेमकं काय झालं पाहा

सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. ‘व्याघ्र प्रकल्पामुळे स्थानिक व्यक्तींना उपजीविकेचा पर्याय उपलब्ध होतो तसेच यामुळे प्राणी संवर्धनासाठी मदत होते. काही व्यक्तींच्या अशा चुकीच्या कृत्यांमुळे हे बदनाम होत आहे. कृपया जंगल सफारी दरम्यान तुमच्या मित्रांना असे कृत्य टाळण्याचा आणि समजूतदारपणे वागण्याचा सल्ला द्या.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video man chases tiger during jungle safari netizens give angry reaction over this foolish act pns