Viral Video: अनेक जण वाढदिवसासाठी गाडी, ट्रेन किंवा विविध पदार्थांसारखे दिसणारे नवनवीन केक बनवत असतात. विलक्षण सादरीकरण करण्यासाठी खाण्यायोग्य कलाकृती तयार करतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे की, अन्नाचा वापर एखादे वाद्य बनवण्यासाठी केला जाऊ शकतो? नाही… तर आज व्हायरल व्हिडीओत असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. एका व्यक्तीने गाजरापासून बासरी बनवली आहे.
डिजिटल क्रिएटर निर्माता इथन टायलर स्मिथने गाजरापासून एक बासरी बनवली आहे. गाजराचा वरचा भाग कापून त्याला व्यवस्थित सोलून, ड्रिल मशीनच्या सहाय्याने गाजराचे सर्व कण बाहेर काढून घेतले. नंतर गाजर पाण्यात स्वच्छ धुवून घेतले व त्याला पुसून घेतले आहे. त्यानंतर बासरीसारखी रचना करण्यासाठी त्याला आकार दिला जातो आहे. गाजरापासून कशाप्रकारे बासरी बनवली एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून पाहा.
हेही वाचा…‘कष्टाची कमाई’! ट्रकमध्ये फूड ब्लॉगिंग करत केली कमाल; आनंद महिंद्रांनी सांगितली ‘त्या’ची गोष्ट
व्हिडीओ नक्की बघा…
तुम्ही व्हिडीओत पाहिलं असेल की, बासरीला हाताच्या बोटांनी घडी ठेवून स्वर काढण्यासाठी छिद्रे असतात. तर गाजराचीसुद्धा या व्यक्तीने सुरीच्या सहाय्याने कापून अशीच हुबेहूब रचना केली आहे आणि अशाप्रकारे गाजर-बासरी तयार झाली आहे. नंतर व्हिडीओच्या शेवटी त्याने या गाजरापासून बासरीदेखील वाजवून दाखवली आहे, जे पाहून तुम्हाला नक्कीच नवल वाटेल.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @musoraofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून बासरी वाजवणाऱ्या व्यक्तीच्या कल्पनेची प्रशंसा, तर त्याने गाजरापासून बनवलेल्या बासरीच्या रचनेचं कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. एकूणच सोशल मीडियावर या अनोख्या व्हिडीओने अनेकांच लक्ष वेधून घेतलं आहे.