तुम्ही जर सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तुम्हाला एकापेक्षा एक मनोरंजक गोष्टी पाहायला मिळत असतात. सोशल मीडियावर असे काही व्हिडीओ आहेत ज्यांना पाहून लोक आश्चर्यचकित होतात. तर काही व्हिडीओ पाहून यूजर्स खूप हसतात. तसंच काही लोकांना काही व्हिडीओवर विश्वास ठेवणं कठीण जातं. एका डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने असा डान्स केला, ज्याला पाहून लोक आश्चर्यचकित झाले आणि सोबत हसू देखील आवरत नव्हतं.
लग्न, पार्टी किंवा कोणत्याही सोहळ्यामध्ये तुम्ही लोकांना वेगवेगळ्या स्टाईलमध्ये नाचताना पाहिलं असेल. तसंच काही लोकांना गाणे कानावर पडले की डान्स करण्याचा मोह आवरत नाही. पण, एका व्यक्तीने डान्सची एक नवी स्टाईलच मार्केटमध्ये आणलीय. व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून कुणाचे तरी लग्न होत असल्याचे दिसत आहे. प्रत्येकजण मजा करत आहे. मग एखादी व्यक्ती अनोख्या पद्धतीने नाचू लागते. त्या व्यक्तीकडे पाहून असं वाटतं की जणू तो भारतीय लष्कराचा सैनिक आहे आणि डान्सच्या माध्यमातून तो आदेश पाळताना दिसत आहे. कारण, सैनिकांना ज्या पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते, त्याच पद्धतीने तो लग्नात नाचताना दिसत आहे.
आणखी वाचा : काश्मीरला गेलेल्या मुलीला ही गोष्ट बघायला मिळालीच नाही, पाहा हा VIRAL VIDEO
सोशल मीडियावर हा व्हिडीओ अगदी वाऱ्यासारखा पसरला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. या अनोख्या डान्स प्रकाराचा व्हिडीओ सध्या लोकांना खूपच आवडू लागलाय. असा डान्स तुम्ही कदाचित पहिल्यांदाच पाहत असाल. हा डान्स व्हिडीओ पाहून सारेच जण थक्क होत आहेत. विशेष म्हणजे या व्यक्तीच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : नियमांची ‘ऐशी तैशी’! थेट बंदूक घेऊन कार्यक्रमात पोहोचला हा व्यक्ती, भरपूर नाचला पण आता….
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या कुत्र्याने पाहा काय केलं?
व्हिडीओ शेअर करताना त्यांनी एक कॅप्शन देखील लिहिली आहे. ‘ट्रेनिंग संपताच तो तरुण मित्राच्या मिरवणुकीत पोहोचला’. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ८० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडीओला शेकडो लोकांनी लाइक केलं आहे. तर, चॅटिंग करताना लोक या व्हिडीओवर कमेंट करत आहेत आणि डान्सचे अनेक मजेदार व्हिडीओ शेअर करत आहेत.