viral Video: उन्हाळा आला की, घशाला सतत कोरड पडते, घामाने पूर्ण अंग भिजून जाते. त्यामुळे कंटाळल्याने अनेकांचा आहारही कमी होतो आणि सतत काहीतरी थंड प्यावेसे वाटते. लिंबू सरबत, कोकम सरबत यांबरोबरच उसाचा रस अनेकांना या उन्हाळ्यात हमखास प्यावासा वाटतो. रसवंती केंद्रात विजेवर चालणाऱ्या यंत्राच्या साह्याने उसाचा रस काढला जातो. हा रस मग ग्लासमध्ये ओतून दिला जातो. नंतर मग त्यात बर्फ टाकून ग्राहकांना दिला जातो. उसाच्या रसाचा एक घोट घेताच मन अगदी तृप्त होऊन जाते.

अजूनही काही ठिकाणी बैलांच्या साह्याने फिरविल्या जाणाऱ्या लाकडी घाण्यावर उसाचा रस काढला जातो. पण, वाढत्या तंत्रज्ञानाच्या जगात त्यांची जागा यंत्रांनी घेतली आहे. तसेच काही व्यापारी ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधून काढतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये जुन्या गाडीमध्ये काही यंत्रे बसवून, उसाचा रस काढला जातो. व्यापाऱ्याने गाडीच्या डिकीमध्ये हा व्यवसाय सुरू केला आहे. एकदा पाहाच व्यापाऱ्याचे हे अनोखे रसवंतीगृह…

, दिवाळी साफसफाई
“हरे राम हरे राम, घरचे करा तुम्ही काम” दिवाळीच्या सफाईवर तरुणांनी गायले वऱ्हाडी रॅप, चिमुकलीने केला भन्नाट डान्स, Video बघाच
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Teacher Teach The Arm Span To Height Ratio In Class
VIRAL VIDEO : विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनोखा अंदाज, उंची मोजण्यासाठी दाखवला हा जबरदस्त हॅक, एकदा पाहाच
savlyachi Janu Savali fame veena jagtap gift to megha dhade
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ फेम वीणा जगतापने मेघा धाडेला दिवाळीनिमित्ताने दिलं खास गिफ्ट, व्हिडीओ होतोय व्हायरल
Aai kuthe kay karte fame Rupali bhosale bought a new car
Video: ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेने दिवाळीच्या मुहूर्तावर घेतली नवी आलिशान गाडी, पाहा व्हिडीओ
Actress Vidya Balan explanation of the movie Bhulbhulaiyaa 3
डझनावारी चित्रपटांतून नकाराचा अनुभव; ‘भुलभुलैया ३’ चित्रपटातील अभिनेत्री विद्या बालनचे स्पष्टीकरण
Do you know how to make Chakali in the market
बाजारातील तयार चकल्या कशा बनवतात माहीत आहे का? पाहा VIRAL VIDEO तून ‘हा’ जुगाड
Bigg Boss Marathi fame Nikki Tamboli and Arbaaz Patel shared a special video on occasion of Diwali, Rakhi Sawant comment viral
Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम निक्की तांबोळी-अरबाज पटेलने दिवाळीनिमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ, राखी सावंतच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

हेही वाचा…कुणाचं काय तर? कुणाचं काय? महिलेची हेल्मेट घालण्याची नवीन पद्धत; VIDEO होतोय तुफान व्हायरल

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, गाडीच्या टपावर ऊस बांधून ठेवले आहेत. डिकीत व गाडीच्या सीटमागे काही यंत्रे बसवली आहेत. त्यामध्ये ऊस घालून, उसाचा रस काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर गाळणीद्वारे उसाचा रस गाळून, तो ग्राहकांना दिला जाणार आहे. तेथे उपस्थित असलेल्या एका ग्राहकाने हा व्हिडीओ शूट करून घेतला आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे ; जो अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ChapraZila या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. जुन्या कारचा पुन्हा उपयोग करून, या व्यापाऱ्याने अनोखी शक्कल लढवली आहे आणि ग्राहकांनाही आकर्षित करण्याचा मार्ग शोधून काढला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी व्यापाऱ्याच्या कल्पनेचे आणि फिरत्या रसवंतीगृहामधून उसाचा रस विकण्याच्या योजनेचे विविध शब्दांत कौतुक करताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत.

अनेक व्यावसायिक छोट्यातली छोटी वस्तूदेखील अतिशय क्रिएटिव्ह पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी अनेक आयडिया केल्या जातात. आज व्हायरल व्हिडीओत याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले आहे.याआधी सुद्धा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ; ज्यामध्ये बर्फाचा उपयोग न करता थंडगार उसाचा रस ग्राहकांना दिला जात होता. त्याने ऊस गार करण्यासाठी नवीन मोठे फ्रिज विकत घेतले होते आणि त्या फ्रीजमध्ये ऊस दोन अडीच तास गार होण्यासाठी ठेवला होता. आणि त्यानंतर ग्राहकांना त्या उसाद्वारे काढलेला रस पिण्यासाठी देत होता.