Viral video: आजकाल सोशल मीडियावर ‘फ्यूजन डिश’ हा एक नवीन फूड ट्रेंड बनला आहे. लोक रोज नवनवीन रेसिपी ट्राय करत आहेत, त्या सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. एखादा पदार्थ आवडतो म्हणजे त्याची चव आवडते आणि ती दुसऱ्या कोणत्या पदार्थासोबत अधिक चविष्ट लागेल याचा विचार होतो. जगभर जे फ्यूजन फूड मिळतेय त्यामागे हाच विचार मुख्य असतो. त्यातून अनेक चवीचे संगम घडलेत. मात्र, काही लोक खूपच विरुद्ध पदार्थ एकत्र करून खातात. मात्र आता समोर आलेला व्हिडीओनं या सगळ्याला मागे सोडलं आहे. या व्यक्तीनं चक्क खिळे खाल्ले आहेत. तुमचाही यावर विश्वास बसत नाही ना, मग हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहा…तुम्हीही अवाक् व्हाल…
सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातले काही गमतीशीर असतात तर काही विचित्र असतात. असाच एक विचित्रि व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आपण चिवडा ज्याप्रमाणे सहज तोंडात टाकून खातो. तसंच हा व्यक्ती चक्क खिळे खातोय. त्यानं अक्षरश: मुठ भरुन खिळे घेतले आहेत. आणि तो हे खिळे सहज खातोय. एवढंच नाहीतर तो व्यक्ती ते गिळतही आहे. त्यानंतर त्याच्या हातात पाण्याची बॉटल दिसत आहे. तो खिळे खाल्ल्यावर त्यावर पाणीही पित आहे. हा व्हिडीओ पाहताना तुमच्याही अंगावर काटा येईल मात्र हा व्यक्ती अगदी सहज खिळे खात आहे. हे पाहून पाहून सर्वच हैराण झाले आहेत. तुम्हीही पाहा हा व्हिडीओ..
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Viral Video: गंगेतून पकडलेल्या मगरीची भाविकांनी केली पूजा; लोकांनी केला ‘जय श्रीराम’चा जयघोष
हा व्हिडीओ ahmadsalari.2 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. एका युजरने म्हंटलंय “हा माणूस आहे की राक्षस”, त्याचवेळी दुसरा म्हणतो “अजून काय काय पहावं लागणार आहे”. तर तिसऱ्या युजरने कमेंट केली की, “हे फेक तर नाही ना.”