सोशल मीडियावर पती पत्नीचे अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओला नेटकऱ्यांची चांगली पसंतीही मिळते. सध्या पती पत्नीचा एक भावूक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. यात एक पत्नी आपल्या पतीला असं गिफ्ट देते की ते पाहूनच पती रडू लागतो आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडताना दिसून येतात. या पतीची रिअॅक्शन पाहून हा व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पती, पत्नी आणि त्यांची मुलगी एकत्र मिळून आपल्याला आलेले खिसमस गिफ्ट उघडण्यासाठी बसलेले असतात. एका पिशवीत असलेले एक गिफ्ट पाहून पती सुरूवातीला आश्चर्य होतो. यावर काय प्रतिक्रिया द्यावी, हे त्याला सुरूवातीला काही कळत नव्हतं. तो फक्त पत्नीकडेच पाहत असतो आणि थोड्या वेळाने हे गिफ्ट तो त्याच्या ह्रदयाशी लावून धरतो. त्यानंतर चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल देऊन आपल्या भावनांना आवर घालण्याचा तो प्रयत्न करत असतो. पण डोळ्यात आलेले अश्रू लपवण्यासाठी तो खाली पाहत राहतो. पण शेवटी त्याच्या अश्रूंचा बांध फूटतो आणि रडू लागतो.

आणखी वाचा : स्वतःच्या सावलीसोबत खेळताना कुत्र्याचा VIDEO VIRAL, पाहून खळखळून हसाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : राणीच्या रॉयल गार्डने रूट मार्च करताना लहान मुलाला चक्क तुडवलं, पूर्ण व्हिडीओ पाहण्याचं धाडस होणार नाही

हा व्हिडीओ ‘गुडन्यूज करस्पॉन्डंट’ नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. “मन पिघळवून जातं…आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींची कदर करा आणि तुमचं आयुष्य परिपूर्ण होईल’, असं लिहित हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडलाय की, आतापर्यंत १६ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि ४०० पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

पतीने दोन वर्षांपूर्वी लग्नाचा मूळ बँड गमावला होता. तो बँड फार महाग नव्हता, पण त्याला तो खूप आवडला होता. त्याच्या पत्नीने यापूर्वी अनेकदा त्याला नवीन अंगठी देऊ केली होती, परंतु त्याला त्याची जुनी अंगठी हवी होती. या व्हिडीओमध्ये असं म्हटलं आहे की, नोव्हेंबरमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाल्यामुळे कुटुंबाने ख्रिसमससाठी काहीही नियोजन केलं नाही. पण, त्यांनी त्यांच्या ३ वर्षांच्या मुलीसाठी काही जुन्या भेटवस्तू आणि कँडीसह भरलेले स्टॉकिंग्ज उघडले. तेव्हा त्या माणसाला एक सरप्राईज गिफ्ट दिसलं. त्याच्या पत्नीने त्याला ख्रिसमससाठी लग्नाचा जो बँड हरवला होता, अगदी तसाच बॅंड गिफ्ट केला.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : चालत्या मेट्रो ट्रेनमध्ये तरुणांनी गायलं AR Rahman चं गाणं, गोड आवाजावर नेटकरी फिदा, व्हिडीओ पाहाच

पती-पत्नीच्या नात्यामधील प्रेम दाखवणारा हा व्हिडीओ लोकांना खूपच भावला आहे. लोक या व्हिडीओवर आपल्या वेगवेगळ्या भावना व्यक्त करताना दिसून येत आहेत. यावरील कमेंट्स देखील वाचण्यासारख्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video man emotional reaction christmas present wife wedding ring watch prp