अनेक वेळा लोकांना एखाद्या विशिष्ट रेस्तरॉंमध्ये जाऊन जेवायची इच्छा होते. कधी कधी एकाच ठिकाणाहून हवं ते खायलाही मिळतं. ऐन हिमवर्षाव सुरू असताना या माणसाला रेस्तरॉंमध्ये जाऊन जेवण खायची इच्छा झाली. हिमवर्षावात थंडीचाही विचार न करता हा रेस्तरॉं गाठतो खरं, पण तिथे गेल्यानंतर रेस्तरॉंला टाळं पाहून अक्षरशः त्याने गुडघेच टेकले. कधी कधी आपल्याला ठराविक ठिकाणचं जेवण खायची अगदी मनापासून इच्छा होते. पण जेव्हा इच्छा होते नेमकं त्याचवेळी ते रेस्तरॉं बंद असल्याचं पाहून या माणसाच्या मनाला काय वेदना झाल्या असतील, हे दाखवणारा हा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांना खूपच भावलाय. हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागलाय.
अनेक खवय्यांना कधी आणि काय खायची इच्छा होईल, हे सांगता येत. त्यातही आपल्याला एखाद्या ठिकाणचं जेवणं आवडलं की त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याच ठिकाणचं जेवण रूचकर लागत नाही. असंच काही घडलंय या व्हायरल व्हिडीओमधल्या माणसासोबत. सगळीकडे हिमवर्षाव सुरू असताना या माणसाला त्याच्या आवडत्या रेस्तरॉंमध्ये जाऊन खाण्याची इच्छा झाली. यासाठी या माणसाने कोसळणाऱ्या बर्फवृष्टीचा देखील विचार केला. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सगळीकडे चोहीकडे अगदी गुडघाभर बर्ष साचलेला दिसून येतोय. या पांढऱ्या शुभ्र आणि थंडगर बर्फातून या माणसाने कशी बशी आपली वाट काढत रेस्तरॉं गाठलं. पण तिथे गेल्यानंतर या माणसाचा चांगलाच हिरमोड झालाय.
ऐन हिमवर्षावात या माणसाने कसं बसं रेस्तरॉं गाठल्यानंतर ते बंद असल्याचं त्याने पाहिलं. मनापासून खायची इच्छा झाली आणि त्यात रेस्तरॉं देखील बंद असल्याचं पाहून या व्यक्तीने आहे त्याच जागी आपले गुडघे टेकले आणि निराश झाला. त्याच्या चेहऱ्यावर निराशेचे भाव अगदी स्पष्टपणे दिसून येत आहेत. हिरमोड झाल्यानंतर या व्यक्ती काही वेळ तसाच बसून राहतो आणि थोड्या वेळाने पुन्हा उठून त्याच निऱाशेत आल्या पावली तसाच निघून जातो.
आणखी वाचा : रिपोर्टरने घेतली ‘बिहारी बॉय’ची मुलाखत, मुलाच्या मजेशीर उत्तराचा VIDEO VIRAL
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : ‘हा’ माणूस एकाच वेळी ५० ऑम्लेट खातो, VIRAL VIDEO पाहून तुम्ही सुद्धा व्हाल हैराण
हा व्हिडीओ niceys.eatery नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ ४ दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ शेअर केल्यापासून या व्हिडीओला आतापर्यंत २८ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या व्हिडीओला लोकांच्या भरभरून प्रतिक्रियाही मिळाल्या आहेत.
आणखी वाचा : काय सांगता? एकाच वेळी अनेक मुलींना करत होता डेट, एका टिकटॉक युजरच्या VIRAL VIDEO मुळे झाला भांडाफोड
“आता मला खाण्याचा प्रयत्न करायला हवा! जर तो एका प्लेटसाठी एवढी मेहनत करतो. तर मग मी जे आहे ते खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे!” अशी कमेंट एका इन्स्टाग्राम युजरने लिहिली आहे.” “आम्हाला या माणसाला शोधायचे आहे आणि कोणत्याही किंमतीत त्याचे संरक्षण करावे लागेल,” असं देखील आणखी एका दुसर्या युजरने विनोद केलाय. “मला आशा आहे की त्याला दुसरं रेस्टॉरंट सापडेल,” असं तिसरा युजर कमेंट करत म्हणाला. अशा वेगवेगळ्या कमेंट्स या व्हिडीओवर येत आहेत. या सर्व प्रतिक्रिया वाचण्यासारख्या आहेत.