पाणी हे जीवन आहे ही गोष्ट आपण नेहमी ऐकतो. कोणताही सजीव प्राणी पाण्याशिवाय जगू शकत नाही. यामुळे पाणी हा नैसर्गिक स्त्रोत जपून वापरण्याचा सल्ला दिला जातो. तहानलेल्या जीवाला पाणी देणं हे अत्यंत पुण्याचे कार्य मानले जाते. म्हणून आपला शत्रू जरी तहानेने व्याकूळ झाला असेल तरी पाणी दिले पाहिजे. रणरणत्या उन्हातून आपल्या घरी आलेल्या ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीलाही आधी पाणी विचारले पाहिजे. अनेकजण माणुसकी म्हणून घराबाहेर किंवा रस्त्याच्या कडेला पाणी ठेवतात. जेणेकरून रस्त्यावरून तहानलेल्या व्यक्ती, प्राणी, पक्षी आपली तहान भागवू शकतील. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्याच एक व्यक्ती जीवाची पर्वा न करता भयाण वाळवंटात तहानलेल्या लांडग्याला पाणी पाजतोय.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक माणूस भयाण वाळवंटात जिथे साध चिट पाखरूही दिसत नाही, तिथे तहानेने भटकणाऱ्या लांडग्याला स्वत:च्या बाटलीतून पाणी पाजताना दिसत आहे. लांडगा हा प्राणी खूप धोकादायक मानला जातो कारम तो माणसांवर जीवघेणा हल्ला करू शकतो.अशा प्राण्यासमोर जीवाची पर्वा न करता त्या व्यक्तीने त्याला पाणी देऊन तहान भागवली. यामुळे अजूनही माणसात माणुसकी जिवंत असल्याचे यातून दिसतेय. यानंतर बाटलीतील उरलेले पाणी त्याने लांडग्याच्या अंगावर स्प्रे केले, जेणेकरून त्याला थोडा थंडावा मिळेल. या व्यक्तीने केलेले हे काम थोडे धाडसाचे असेल तर त्यातून त्याला एक समाधान मिळवून देणारे ठरले.
चहावाल्याचं अत्यंत किळसवाण कृत्य! लघवी केलेल्या कपातून ग्राहकाला दिला चहा, संतापजनक Video Viral
हा व्हिडिओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, वाळवंटात तहानलेल्या लांडग्याला पाणी देणे, यापेक्षा मोठे समाधान असूच शकत नाही. हा व्हिडीओ तासाभरापूर्वी शेअर करण्यात आला असून आत्तापर्यंत तो २ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्या व्यक्तीचे कौतुक करत आहेत.