दिवाळी संपली की पतंगांचा मोसम जवळ येऊ लागतो. रंगीबेरंगी आणि विविध आकाराचे पतंग उडविण्यात वेगळीच मजा असते. पतंग खाली पडू न देता दोरी हळूहळू सैल सोडत पतंगाला आकाशात उडवण्याचा जो अनुभव असतो तो कोणत्याच खेळात येत नाही. पण जर पतंग उडवता उडवता उडवणारा माणूसच जर हवेत उडून गेला तर ? काय, आश्चर्य वाटलं ना? ही कोणतीही कल्पना नाही तर प्रत्यक्षात घडलेली घटना आहे. पतंग उडवत असताना अचानक एक व्यक्ती पतंगासोबतच आकाशात उडून गेल्याची धक्कादायक घटना घडलीय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. यावर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ श्रीलंकेमधल्या जाफनामधला आहे. इंडिया टुडेच्या बातमीनुसार, नुकतीच श्रीलंकेतल्या जाफनामध्ये पतंग उडवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तेव्हा ही घटना घडली आहे. हा व्यक्ती त्याच्या टीमच्या मदतीने मांजा पकडून एक मोठा पतंग हवेत उडवण्याचा प्रयत्न करत होता. पतंग तर हवेत उडाला पण या पतंगासोबत तो व्यक्तीसुद्धा हवेत उडू लागला. बघता बघता हा व्यक्ती उंच आकाशात जवळजवळ ३० फूट उंचावर गेला. त्याचे साथीदार आणि आजुबाजूला जे नागरिक होते त्यांना त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. आपण एखाद्या चित्रपटातला सीन पाहतोय की काय असा भास होऊ लागतो. हे पाहून सारेच जण थक्क झाले.
आणखी वाचा : सेम टू सेम श्रीदेवीसारखी दिसणारी तरूणी आहे तरी कोण ? VIRAL VIDEO पाहून तुम्ही सुद्धा व्हाल हैराण !
खरं तर पतंग इतका जड होता की त्याबरोबर व्यक्ती सुद्धा पतंगाबरोबर हवेत उडू लागला आणि तो वर आकाशात ३० फूट उंचावर मांजाला धरून लटकत राहिला. यानंतर त्याचे साथीदार दोरी सोडा नाहीतर पतंग आणखी उंचावर जाईल, असं जोरजोराने ओरडताना दिसून येत आहेत. अखेर पतंग थोडा खाली येताच हा व्यक्ती खाली येण्यासाठी प्रयत्न करत होता. पण वारा इतका जोरात वाहू लागला होता की पतंग लगेच हवेत उडू लागला. अखेर मग या व्यक्तीने ३० फूट उंचीवरून उडी घेतली आणि तो जमिनीवर कोसळला.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : मस्ती मस्तीत रॉकेट पेटवला, पण तो उडत उडत बिल्डिंगमध्ये घुसला, पुढे जे झालं ते पाहा!
अखेर या व्यक्तीने कसाबसा आपला जीव वाचवला. पण ३० फूट उंचीवरून उडी घेतल्याने त्याला दुखापत झाली. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती त्याच्या साथीदारांसह ज्यूटच्या मांजाने बांधलेला मोठा पतंग उचलण्याचा प्रयत्न करत होता. पतंग उडू लागताच सर्वांनी तो सोडला आणि तो तसाच धरून राहिला. पतंग वेगाने वर येऊ लागला आणि एकदा तो जमिनीपासून किमान ३० फूट उंच हवेत लटकला.
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : नवरदेवाच्या जबरदस्त डान्सपुढे नवरी सुद्धा फिकी पडली; वऱ्हाडी सुद्धा झाले अवाक, पाहा VIRAL VIDEO
त्याच क्षणी तो खाली पडला आणि त्याचे साथीदार त्याला घेऊन आले. श्रीलंकेच्या जाफना येथे थाई पोंगलच्या निमित्ताने पतंग उडवण्याची स्पर्धा आयोजित केली जाते आणि त्या भागात पतंगबाजीला खूप पसंती दिली जाते. या दरम्यान येथे मोठमोठे आणि जड पतंग उडवले जातात.
हा व्हिडीओ SriLankaTweet नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत ३१ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून लोक या व्हिडीओखालील कमेंट्स सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत. काही युजर्सनी तर या व्हिडीओवर वेगवेगळे विनोद शेअर करण्यात सुरूवात केली. तर काही युजर्सनी पतंग उडवताना काळजी घेण्याचं आवाहन केलंय.