Viral Video: सध्या तरुणाईंमध्ये टॅटूची प्रचंड क्रेझ आहे. टॅटू काढणे म्हणजे फॅशनचा एक भाग झाला आहे. टॅटूच्या माध्यमातून अनेक आठवणी कायमस्वरूपी जतन करून ठेवता येतात. आई-वडिलांचे नाव, स्वतःचे किंवा प्रियकराचे नाव किंवा त्याने प्रपोज केल्याची तारीख, विशिष्ट महत्त्व असणारी चित्रे आदी अनेक टॅटूचे प्रकार शरीरावर गोंदवून घेण्यात येतात. पण, आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, इथे चक्क एका तरुणाने कपाळावर क्यूआर कोडचा टॅटू गोंदवून घेतला आहे. पण, असा टॅटू काढण्याचे तरुणाचे कारणही अगदीच अनोखं आहे.
व्हायरल व्हिडीओ परदेशातला आहे. यात तरुणाची टॅटू काढण्याची प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. सुरुवातीला तरुणाला थोड्या वेदना होतात, पण टॅटू आर्टिस्ट तरुणाने सांगितल्याप्रमाणे त्याच्या कपाळावर क्यूआर कोडचा टॅटू काढताना दिसून येत आहे. हा टॅटू काढून झाल्यानंतर टॅटू आर्टिस्टने हा कोड स्कॅन केला. स्कॅन केल्यानंतर काय दिसलं हे एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.
व्हिडीओ नक्की बघा :
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, तरुणाने कपाळावर क्यूआर कोडचा टॅटू काढून घेतला आहे. टॅटू आर्टिस्ट जेव्हा हा क्यूआर कोडचा टॅटू स्कॅन करतो तेव्हा तरुणाचे इन्स्टाग्राम अकाउंट ओपन होते . म्हणजेच तरुणाच्या कपाळावर काढलेला क्यूआर कोड जी व्यक्ती स्कॅन करेल ती थेट तरुणाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोहचेल. तरुण सोशल मीडियाचा इन्फ्लूएन्सर आहे, म्हणूनच त्याने फॉलोवर्स वाढवण्यासाठी अशी भन्नाट युक्ती शोधून काढली आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @unilad या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काही जण म्हणत आहेत की, ‘ही चांगली कल्पना आहे’, तर दुसऱ्या युजरचे म्हणणे आहे की, ‘हे खोटं आहे’, तर तिसऱ्या युजरने लिहिलं की, ‘याचा काही उपयोग नाही आहे’ ; अशा विविध कमेंट नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.