सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं त्याच्या एका डरकाळीने जंगल हादरत, शिवाय मोठमोठे प्राणीदेखील या डरकाळीला घाबरून पळून जातात. सिंहाने केलेल्या भयानक आणि धाडसी शिकारीचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत असतो. मात्र, सध्या या जंगलाच्या राजाला अनेक लोक घरामध्ये पाळत असल्याचंही तुम्ही पाहिलं असेल. यासाठी सिंहाच्या पिल्लांना जन्मल्यापासूनच माणसाच्या सहवासात ठेवलं जातं. जेणेकरुन त्याला माणसांची सवय व्हावी त्यानुसार अनेक लोकांनी आपल्या घरात सिंहाची पिल्ल पाळल्याचंही तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं असेल.

हेही पाहा- Video: काळ आला होता, पण…! काही क्षणाचा विलंब अन् दोघेही झाले असते वाघाची शिकार

Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
satish wagh murder case mohini wagh and 5 others remanded to police custody till 30 december
खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
forest fire cases
राज्यात तब्बल १६ हजारांहून अधिकवेळा जंगलाला आग
dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा

मात्र, प्राण्यांना कितीही प्रशिक्षण दिले तरी त्यांच्यात असणारा मुळचा जंगली आणि हिंस्र स्वभाव कधीच संपू शकत नाही. त्यामुळे असे प्राणी पाळण्याचं भलतं धाडसं करण्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागल्याच्या अनेक घटना यापुर्वी घडल्या आहेत. हे पाळीव प्राणी अनेकदा आपल्या मालकावर हल्ला केल्याचे व्हिडीओदेखील इंटरनेटवर पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.

हेही पाहा- व्हिडीओ शूट करताना ड्रोनच्या आवाजाने भडकली मगर अन् घडलं भलतंच; पाहा Viral video

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर earth.reel नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये एक माणूस सिंहाच्या गळ्यात साखळी बांधून त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, या व्यक्तीचे हे कृत्य सिंहाला आवडल्याचं दिसतं नाही. त्यामुळे सिंह रागवतो आणि त्या माणसावर हल्ला करतो. सिंहाने हल्ला करताच साखळी बाधण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती जीव वाचवण्यासाठी भीतीने पळून जाताना व्हिडीओमध्ये दिसतं आहे.

‘सिंहाला पाळणं म्हणजे जीव धोक्यात घालणं’ –

दरम्यान, या व्हिडीओमध्ये आणखी एक व्यक्ती दिसत असून तो त्या सिंहाला साखळी बांधण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला मदत करताना दिसत आहे. शिवाय पाळीव सिंह असल्याने तो काही वेळाने सिंह शांत झाल्याचंही दिसत आहे. मात्र, सिंह हा सिंह असतो तो कधीही हल्ला करु शकतो त्यामुळे त्याच्यापासून सावध रहायला हवं अशा कमेंट नेटकरी करत आहेत. तसंच सिंहाला पाळीव प्राणी बनवून त्याच्याशी खेळणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारख असल्याचंही नेटकरी म्हणत आहेत.

Story img Loader