Viral Video: एखाद्याचा काळ आलेला असतो पण वेळ… सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधील व्यक्तीला या प्रचलित म्हणीचा पुरता अनुभव आला असावा. अवघ्या काही सेकंदात मृत्यूच्या वेढ्यातून परत आलेला हा व्यक्ती व्हिडिओमध्ये पूर्णतः हादरलेला दिसून येतोय. आपण पाहू शकता की या व्हिडिओमध्ये लिफ्टच्या दारात अडकून या व्यक्तीचं डोकं अन धड वेगळं होणार इतक्यात तो सुदैवाने वाचतो. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सदर प्रकार रशियाच्या क्रास्नोदर इथे एका गृहसंकुलाच्या लिफ्टमध्ये घडला आहे
व्हायरल व्हिडिओमध्ये एक रहिवाशी लिफ्टमधून बाहेर येताना दिसत आहे. सुरुवातीचे काही सेकंद लिफ्टमध्ये काही बिघाड असेल असे वाटणारच नाही पण अचानक जेव्हा समोरून एक व्यक्ती लिफ्टमधून आत येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लिफ्टचा वेग वाढतो आणि लिफ्ट खाली कोसळेल असे वाटते. लिफ्टमधून आत येणारा व्यक्ती फोनकडे बघत येत असल्याने त्याचं लक्ष नसतं. सुदैवाने लिफ्टमधील व्यक्तीने वेग लक्षात घेत आरडाओरडा केला व हा इसम पटकन मागे सरकला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या खूप व्हायरल होत आहे.
पाहा मृत्यूचा थरार..
Video: ‘सेक्रेड गेम्स’ फेम अभिनेत्रीने Instagram वर काढले कपडे; इराणच्या हिजाब वादावर बोल्ड भूमिका
समयसूचकता दाखवल्याने हा मोठा अपघात टळला पण फोनच्या नादात जीव विसरु नये याचा मोठा धडा या व्यक्तीलाच नव्हे तर आपल्यालाही मिळाला असेलच. नेटिझन्सने हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मी स्वप्नातही हा विचार करू इच्छित नाही असे काहींनी म्हंटले आहे तर यापुढे मी जिन्यानेच जाणार असाही निर्णय काहींनी घेतला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला जवळपास ३१ हजार व्ह्यूज मिळाले आहेत.