Viral Video: सध्या अनेक जण सोशल मीडिया प्लॅटफॉमचा उपयोग कौशल्य दाखवण्यासाठी करू लागले आहेत. काही जण या रील फीचरचा उपयोग करून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले तर काही जण अगदीच याचा चुकीचा उपयोग करून ट्रोल होताना दिसले. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर काही लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी अपहरणाचा खोटा रील शूट (प्रँक) केला आहे आणि असं करणे त्याला चांगलचं महागात पडलं आहे.
व्हायरल व्हिडीओ नोएडाचा आहे. एक तरुण काही मुलांना कारमध्ये बसण्यास आग्रह करताना दिसत आहे. तरुण काही मुलांना त्यांचे अपहरण करण्यात आले आहे हे सांगण्यापूर्वी त्यांना राईड देण्याचे नाटक करतो. मुले घाबरतात आणि चालत्या वाहनात आरडाओरडा करताना दिसतात व पळून जाण्याचा प्रयत्नही करताना दिसतात. पण, नंतर तरुण हा एक प्रँक होता व लहान मुलांना गाडीतून उतरवण्यापूर्वी त्यांचे सांत्वन करताना दिसतो. एकदा पाहाच अंगावर शहारे आणणारा हा व्हायरल व्हिडीओ.
हेही वाचा…ना गाडी, ना घोडा… वरातीसाठी मंडपापर्यंत नाचत-गाजत नेली इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा पाहाच VIDEO
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, राईड देणार असं म्हणून अनेक चिमुकल्यांना एका तरुणाने गाडीत बसवलं आहे. व्हिडीओ जसा जसा पुढे जातो तसं तरुण चिमुकल्यांना ‘मी तुम्हाला अपहरण करून घेऊन चाललो आहे’ असे सांगताना दिसत आहे. हे ऐकताच चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलताना दिसतात व जोरजोरात रडू लागतात. पण, तरुण मुलांची अवस्था पाहून हसतो आहे आणि त्यांना गप्प करण्याचा इशारा करताना दिसत आहे. नंतर शेवटी मुलांच्या डोक्यावरून हात फिरवून, त्यांना गप्प राहायला सांगून गाडी थांबवतो आणि त्यांना उतरवतो.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ConfidentBathroom637 Reddit ॲपवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच अजित, दीपक आणि अभिषेक नावाच्या तीन तरुणांना सेक्टर १८च्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. एडीसीपी मनीष कुमार मिश्रा यांनी या तिघांच्या कृत्यांचा निषेध केला आहे. पोलिसांनी या तरुणांवर त्वरित कारवाई करून अटक केली. मात्र, त्यांची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली ; सांगण्यात येत आहे. चुकीचा संदेश पोहचवणारा प्रँक व्हिडीओ चित्रित केल्याबद्दल अशी कारवाई करण्यात आली आहे.