काही दिवसांपासून चहावर विविध प्रयोग होताना पाहायला मिळत आहेl. आजवर आपण मसाला चहा, तंदुरी चहा, ग्रीन टी, ब्लॅक टी ऐकून होतो; पण हल्ली चहाचे इतरही अनेक प्रकार समोर येत आहेत. जे पाहून तुमची पुन्हा चहा पिण्याची इच्छा होणार नाही. कोणी चहामध्ये मच्छी टाकून फिश चहा बनवतंय; तर कोणी फळ टाकत फ्रूट चहा. चहावर केल्या जाणाऱ्या या प्रयोगांवर चहाप्रेमींकडूनही तीव्र संताप व्यक्त होताना दिसतोय. यात कमी की काय आता चहाचा आणखी एक नवा प्रकार समोर आला आहे; जो तडका वाली चहा म्हणून फेमस होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आतापर्यंत आपण फक्त प्रसिद्ध तडका दाल ऐकून होतो. मात्र, आता तडका चहा नाव ऐकल्यानंतर वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या स्टॉलवर एक व्यक्ती भाजी, डाळीला ज्या प्रकारे फोडणी देतात, अगदी त्याच प्रकारे चहात बटर, दूध अन् ड्रायफ्रूट्स टाकून फोडणी देत ‘तडका वाली चहा’ बनवत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या चहाच्या टपरीवर एक वृद्ध व्यक्ती एका पातेल्यात सर्वप्रथम भरपूर बटर टाकते. त्यानंतर त्यात दूध आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकते. मग ते काका चहा पावडर, साखर व बदाम टाकून चांगली उकळी येईपर्यंत चहा उकळवतात. हा चहा दिसायला जरी छान दिसत असला तरी चहाप्रेमींनी यावर संताप व्यक्त केला आहे. तसेच सोशल मीडियावरही युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत.

एका युजरनं लिहिलंय की, काका तुम्ही असा चहा विकताय ठीक आहे; पण तो कोण खरेदी करणार? दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, हा चहा प्यायल्यानंतरच ब्रिटिश भारत सोडून गेले. त्याच वेळी तिसऱ्या एका युजरनं गमतीत, काका जिरं, लसणाची फोडणी द्यायला विसरलात का, असा सवाल केला आहे. त्यावर आणखी एका युजरनं, हा चहा पिणाऱ्यांना नरकात विशेष स्थान मिळेल, अशी कमेंट करीत संताप व्यक्त केला आहे.