सापांना सामान्यत: एक महाभयानक प्राणी मानले जाते. साप समोर दिसला तरी भल्या भल्यांना घाम फुटतो. यात जर अजगर असेल तर अनेकांची पळता भुई झाल्याशिवाय राहत नाही. सापापेक्षा अजगर दिसायला तर भयानक असतोच पण त्याच्या विळख्यात एकदा का कोणता प्राणी आला तर सुटणं जवळजवळ अशक्य असते. त्यामुळे अजगराला बघूनचं भल्या भल्यांच्या अंगावर काटा येतो. पण सोशल मीडियावर सध्या दोन अजगरांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात एक व्यक्ती एक नाही तर तब्बल दोन अजगरांची शेपटी अजिबात न घाबरता पकडून आरामात बसला आहे. हा व्यक्ती दुसरी तिसरा कोणी नाही तर अमेरिकन युट्यूबर आणि रेप्टाइल प्राणी संग्रहालयाचे संस्थापक जय ब्रेवर हे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जय ब्रेवर हे इन्स्टाग्राम अकाउंटवर सरपटणारे प्राणी आणि इतर प्राण्यांचे मंनोरजक आणि माहितीपूर्ण व्हिडीओ शेअर करत असतात. अलीकडेच त्यांनी दोन महाकाय अजगरांचा व्हिडीओ शेअर केला होता. यात ब्रेवर यांनी एक नाही तर तब्बल दोन महाकाय अजगरांच्या शेपटीला धरलेले दिसले. व्हिडिओमध्ये दोन मोठे अजगर, एक पांढरा आणि एका काळा – एकमेकांत अडकत पुढे सरपटताना दिसतायत. हे अजगर पाहून कोणीही घाबरेल पण ब्रेवर यांना यात कसलीही भीती वाटत नाही. अगद सहजपणे त्यांनी दोन्ही अजगरांची शेपटी हातात पडून ठेवली आहे. शेपटी पडकली असतानाही हे अजगर कसलीही आक्रमकता न दाखवता अगदी आरामात सरटपटत पुढे जात आहेत.

ब्रेवर यांनी अजगरांच्या जोडीचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, जाळीदार अजगर किती मोठा होऊ शकतो, हे पाहणे आश्चर्यकारक आहे. ही माझ्याकडील सर्वात मोठी अजगरांची जोडी आहे. मला माहित आहे मोठे साप प्रत्येकासाठी नसतात, परंतु लहानपणापासून मला नेहमीच माहित होते की, ते माझ्यासाठी आहेत, परंतु बरेच लोक सहमत नव्हते. मागे वळून पाहताना वाटते की, जीवनात तुमचा स्वतःचा मार्ग निवडणे खूप फायद्याचे ठरू शकते. तुम्ही तरुण असता तेव्हा तुमचे डोके काहीवेळा नकारात्मक गोष्टींपासून दूर ठेवणे कठीण असते. ब्रेवर यांनी भली मोठी कॅप्शन त्यांच्या व्हिडीओखाली दिली आहे जी तुम्ही पूर्ण वाचू शकता.

हा व्हिडिओ ७ मार्च रोजी शेअर करण्यात आला होता. पण आता तो खूप व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ पोस्ट झाल्यापासून ३० लाखांहून अधिक युजर्सनी पाहिला आहे. या व्हिडीओला १,६२,००० युजर्सनी लाईक केला आहे, तर अनेकांनी विविध कमेंट्सही केल्या आहेत. अनेक युजर्सला हा महायक अजगर फार सुंदर वाटत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video man pulls two giant pythons by their tails watch what happens next sjr