अनेक वेळेस आपण करत असलेल्या कृतीचा परिणाम काय होईल? याची कल्पना नसल्याने अनेकांना त्या कृतीचे परिणाम नंतर भोगावे लागतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका पाण्याच्या टाकीमध्ये जळते लाकूड टाकल्यामुळे अशी घटना घडली आहे की ती पाहून तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसेल. सुदैवाने हे लाकूड टाकणारा तरुण या घटनेत बचावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही पाहा- Viral Video: सापाला छेडणं अंगलट, चक्क हवेत उडत साप गेला कॅमेरामनच्या अंगावर अन् घडली जन्माची अद्दल

सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती एका पाण्याच्या टाकीत जळतं लाकूड टाकताना दिसतं आहे. त्याने ते लाकूड टाकीमध्ये टाकताच टाकीतून अचानक एखाद्या रॉकेटप्रमाणे आगीचे लोट बाहेर येताना दिसतं आहे. अचानक आलेल्या आगीमुळे हा लाक़ूड टाकणारा युवक चांगलाचं घाबरलेला दिसतं असून तो कसा तरी आपला जीव वाचवत पळाल्याचं दिसतं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर शहारे येतील.

हेही पाहा- आई त्यागाची मूर्ती! कुत्र्यांच्या तावडीतून पिल्लाला वाचवण्यासाठी तिने स्वत:ला केलं कुर्बान; पाहा हृदयद्रावक Video

दरम्यान, या टाकीमध्ये असं काय होतं? ज्यामुळे ही आग एवढ्या तीव्रतेने बाहेर आली असं अनेक नेटकऱ्यांनी प्रश्न विचारला असता एकाने या व्हिडीओखाली कमेंट करत उत्तर दिलं आहे. @jdelta1adams नावाच्या युजरने सांगितलं आहे की, ही शेतांमध्ये वापरण्यात येणारी पाण्याची टाकी आहे. या टाकीच्या तळामध्ये थोडेसे पाणी टाकण्यात आले आहे. त्या पाण्यात शेवाळ आणि बॅक्टेरिया सहज वाढतो, ज्यामुळे लगेच मिथेन वायू तयार होतो.

जेव्हा हा वायू हवेत मिसळतो तेव्हा तो एका छोट्या छिद्रातून बाहेर पडतो. त्यामुळे मिथेनच्या आगीमुळे आग रॉकेटसारखी बाहेर पडावी अशा प्रकारे स्फोट झाल्याचा दावा त्या युजरने केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ७ मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ किती व्हायरल होत आहे याचा अंदाज तुम्ही लावू शकता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video man put burning wood in the water tank the fire came out like a rocket jap