Viral Video: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी कधी लोक काय करतील हे सांगता येत नाही. अनेकदा फेमस होण्यासाठी केलेल्या कृत्यातून अनेकांनी आपला जीवदेखील गमावलेला आहे. पण, तरीही लोकांना आपल्या जीवापेक्षा सोशल मीडियावरील फेमस होणे जास्त महत्त्वाचे वाटते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक व्यक्ती बाईकवरून हटके स्टंट करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अनेक बाईक रायडर स्वतःच्या जीवाची बाजी लावून नेहमीच वेगवेगळे स्टंट करताना दिसतात. यामध्ये कित्येकदा ते गंभीर जखमीदेखील होतात. नुकत्याच व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्येदेखील एक बाईक रायडर असाच एक हटके स्टंट करत आहे, जो पाहून कोणालाही काही क्षण भीती वाटेल.

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @amitvermaofficial01 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बाईक रायडर चालू बाईकवर झोपून चित्रपटातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी तो त्याचे दोन्ही हात व पायदेखील स्टेपसाठी हलवत आहे, हा व्हिडीओ पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये, “पुष्पा पुष्पा पुष्पराज” असं लिहिलं आहे. या व्हिडीओवर अनेक जण कमेंट्सदेखील करताना दिसत आहेत.

या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास सहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून चाळीस हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. या व्हिडीओवर एका युजरने लिहिलंय की, “तुझा विषय हार्ड आहे भावा”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “प्लीज असे स्टंट करू नका”, तिसऱ्या एकाने लिहिलंय की, “पुष्प राज आणि तू आहेस रायडर राज”, तर आणखी एकाने संताप व्यक्त करत लिहिलंय की, “तुमच्यामुळे समाजातील इतर लोकही असे स्टंट करण्याचा प्रयत्न करतात आणि जीवाला मुकतात.”

हेही वाचा: राहुल गांधींनी रस्त्यावरच्या सलुनमध्ये पोहोचून केला हेअर कट आणि दाढी; नेटकरी म्हणतात, “सगळ्या जागा तुम्हाला..”

पाहा व्हिडीओ:

दरम्यान, या पूर्वीचेदेखील अनेक बाईक रायडर्सचे अनेक स्टंट करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यातील एका व्हिडीओत एका बाईक रायडरच्या डोक्यावर जेसीबीचा पत्रा पडला होता, तर आणखी एका बाईक रायडरचा स्टंटमुळे मोठा अपघात झाला होता.