इंटरनेटच्या दुनियेत प्राण्यांच्या बचावाचे व्हिडीओ चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चिखलात रुतुन बसलेल्या काळवीटाच्या पिल्लाला वाचवण्यासाठी चक्क दलदलीत उतरला. एखाद्या सिनेमात्या हिरोप्रमाणेच या व्यक्तीने आपला जीव धोक्यात घालून काळवीटाच्या पिल्लाचा जीव वाचवला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक त्याला खूप पसंत करत आहेत. काळवीटाच्या पिल्लाला वाचवून या व्यक्तीने जगभरातील लोकांची मने जिंकली आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक काळवीटचं पिल्लू चिखलाच्या दलदलीत अडकलेला दिसत आहे. दलदल इतकी भयंकर होती की काळवीट या चिखलात अगदी रुतून बसलेला दिसत आहे. बराच गाळ साठल्याने या परिसराच्या चारही बाजूने दलदलीची स्थिती निर्माण झाली होती. या व्हिडीओमध्ये दलदलीत पडून मृत्यूशी झुंज देत असलेलं काळवीट या व्यक्तीच्या नजरेस पडले. काळवीटाचं हे पिल्लू दलदलीत इतकं फसलं होतं की त्याला तिथून हलता सुद्धा येत नव्हतं. त्यानंतर हा व्यक्ती कमरेला दोरी बांधून काळवीटाच्या पिल्लाला वाचवण्यासाठी दलदलीत उतरला. दलदलीतल्या चिखलातून कशीबशी वाट काढत हा व्यक्ती काळवीटापर्यंत पोहोचला. आपल्या बचावासाठी कुणीतरी आल्याचं पाहून काळवीटाच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे आहेत.

आणखी वाचा : “आयुष्य सोपं नाही…!”, ट्रॅफिकमध्ये भर पावसात भिजत होता स्विगी डिलिव्हरी बॉय, पाहा VIRAL VIDEO

हा व्यक्ती काळवीटाच्या पिल्लाला चिखलातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. सुरूवातीला त्याच्या आजुबाजूचा चिखल बाजूला सारत पिल्लाला मोकळं करतो. हे पाहून काळवीटाचं पिल्लूही स्वतःहून चिखलातून बाहेर येण्यासाठी धडपड करतं. पण बरेच प्रयत्न करूनही त्याला काही वर येता येत नव्हते. मग हा व्यक्ती काळवीटाच्या पिल्लाचे दोन्ही पाय ओढून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही पाहू शकता, काळवीटाच्या पिल्लाचे पाय जोरात ओढूनही पिल्लू बाहेर येत नव्हते, यावरून ही दलदल किती भयंकर होती, याचा अंदाज येतो. या पिल्लाला चिखलातून हलणंही मुश्किल झालं होतं. पिल्लाला चिखलातून बाहेर काढण्यासाठी बराच वेळ ताकद लावूनही या पिल्लाला चिखलाबाहेर काढणं या व्यक्तीला जमत नाही. पण इतक्यात हार न मानता अखेर या व्यक्तीने एक शक्कल लढवली. पिल्लाचे मागचे दोन पाय आधी त्याने चिखलातून वर काढले आणि त्याला दोरी बांधून दलदलीबाहेर ओढत आणले. त्यानंतर पाण्याने त्याच्या अंगावरचा चिखल साफ करून त्याची सुटका करण्यात आली.

आणखी वाचा : बापरे! HCL च्या सीईओचा पगार किती आहे माहितेय का? पॅकेजमध्ये आहेत इतके शून्य

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : कोणतंही सुरक्षा साधन न वापरता डोंगर चढतात हे भिक्खू, हा VIRAL VIDEO पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

भयंकर दलदलीत उतरून हे धाडसी काम करणारा हा व्यक्ती एक वन अधिकारी आहे. हा व्हिडिओ अतिशय इमोशनल आणि मनाला स्पर्श करून जाणारा आहे. हा व्हिडीओ TansuYegen नावाच्या एका व्यक्तीने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. त्यानंतर हा व्हिडीओ बघता बघता व्हायरल देखील झाला. या व्हिडीओला आतापर्यंत २.४ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ८२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. हा व्हिडीओ पाहून लोक या वन अधिकाऱ्याच्या धाडसाला सलाम ठोकताना दिसत आहेत.

Story img Loader