Danger prank video: आतापर्यंत तुम्ही विविध प्रकारचे गंमतीशीर प्रँक व्हिडीओ पाहिले असतील. प्रँक म्हणजे काय तर Practical Joke, म्हणजेच एखादी कृती करून समोरच्याची फिरकी घेणं. अगदी तुम्ही सुद्धा शाळा, कॉलेजमध्ये असताना असे अनेक प्रँक केले असतील. मित्रमंडळी, शिक्षक किंवा कुटुंबीयांची वगैरे फिकरी घेतली असेल. पण आम्ही खात्री देऊन सांगतो इतका खतरनाक प्रँक ना तुम्ही कधी केला असेल ना पाहिला असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रँक करणं आलं अंगलट –

आजकाल प्रँक व्हिडिओ बनवणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे, काही लोकांना प्रँकचा खूप राग येतो आणि ते नाराजही होतात. परंतु नुकत्याच झालेल्या एका घटनेत, एका अमेरिकन यूट्यूबरला प्रँक केल्यामुळे गोळ्या घातल्या गेल्या. ही घटना अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे राहणाऱ्या युट्युबर टॅनर कुकसोबत घडली असून त्याच्यावर आता हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेपूर्वीचा आणि नंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गोळी चालवतानाचा व्हिडिओ अद्याप समोर आलेला नाही. मात्र नंतरचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.

पाहा व्हिडीओ –

तुम्ही विचार करत असाल हा प्रँक गोळीबारापर्यंत गेलाच कसा, त्याच झालं असं की, टॅनर कुक यूट्यूबवर क्लासिफाइड गून्स नावाचं स्वतःचं चॅनल चालवतो. यावर तो अनेकदा प्रँक व्हिडिओ पोस्ट करत असतो. त्याच्या चॅनलला जवळपास 43 हजार फॉलोअर्स आहेत. 2 एप्रिल रोजी टॅनर व्हर्जिनिया येथील डलेस टाउन सेंटर मॉलमध्ये एक प्रँक व्हिडिओ बनवण्यासाठी पोहोचला. तो यासाठी तो 31 वर्षीय अ‍ॅलन कोलीच्या जवळ गेला. टॅनर प्रँक करत होता आणि त्याचा मित्र दुरून त्याचं रेकॉर्डिंग करत होता. यावेळी अ‍ॅलनला टॅनरचा प्रँक आवडला नाही आणि त्याने चक्क टॅनरला गोळ्या झाडल्याचा आरोप आहे.

हेही वाचा – viral video: तरुणानं एअरपोर्टवर केला अनोखा जुगाड, आता सामानाची अदला-बदल होण्याचं टेन्शनचं नाही

या घटनेनंतर टॅनरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ड्युलेस टाऊन सेंटर गाठलं आणि गोळी झाडणाऱ्या आरोपीला अटक केली