Viral Video: कधी कधी आपण गाढ झोपेत असताना अचानक दचकून उठतो. कारण- कधी कधी आपल्याला आपण उंचावरून खाली पडतो आहोत, असे अथवा अशाच स्वरूपाचे वाईट स्वप्न पडते. त्यामुळे घाबरल्याने खाडकन आपण झोपेतून जागे होतो. कित्येकदा अनेकांच्या बाबतीत असे घडते. पण, आज प्रत्यक्षात एक घटना घडली आहे, जे पाहून तरुण झोपेतून दचकून उठून बसला आहे. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय येणारी घटना आज परदेशात घडली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. एक व्यक्ती गाढ झोपेत असताना एका भरधाव कारने त्याला जोरदार धडक दिली आहे.

व्हिडीओत एक तरुण रस्त्याच्या कडेला सोफा ठेवून आरामात झोपलेला असतो. तितक्यात एका भरधाव कारचे नियंत्रण सुटते व ती तरुणाच्या सोफ्याला येऊन धडकते. टक्कर इतकी जोरदार होती की, गाडी धडकताच सोफा तुटला. हा प्रसंग इतका लगेच घडला की, तरुणाला नक्की काय घडलं हे कळायला काही मार्गच उरला नाही. तरुण झोपलेल्या सोफ्याला गाडी धडकताच उठला आणि घाबरला. तुम्हीसुद्धा बघा हा व्हायरल व्हिडीओ.

Shocking video Couple Dies, 2 Children Injured As Car Collides With Truck On Ahmedabad-Vadodara Expressway
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; कारचा चेंदामेंदा, आईवडीलांचाही मृत्यू,भयंकर अपघातानंतरही २ मुलं कशी बचावली
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
viral video
Video : हे काय चाललंय पुण्यात! वाहतूक पोलिसाच्या अंगावर धावून आली व्यक्ती, नेमकं काय प्रकरण काय?
Shocking video Young Man Risks His Life By Climbing 30-Ft Hoarding On Highway For Instagram Reel In UP's Saharanpur
“हे सगळं करताना एकदाही आई-वडील आठवत नाहीत?” तरुणानं रीलसाठी अक्षरश: कळस गाठला; VIDEO पाहून थरकाप उडेल
Girl fell down of scooty on road funny video goes viral on social media
बापरे! स्कूटी चालवणाऱ्या महिलेनं अक्षरश: एका मागोमाग ४ गाड्यांना दिली धडक; VIDEO पाहून कपाळावर माराल हात
Car took reverse leads to little boy accident mother get panik shocking accident video viral
काय अवस्था झाली असेल त्या आईची? डोळ्यांसमोर मुलाच्या अंगावरून गेली कार, ती किंचाळत राहिली पण…Video पाहून काळजात धडकी भरेल
Railway crossing accident See what happened next when the entire dumper overturned on the car video goes viral
“संपत्ती प्रामाणीकपणाची असेल तर देवही रक्षण करतो” संपूर्ण डंपर कारवर पलटी होणार तेवढ्यात काय घडलं पाहा; VIDEO व्हायरल
Accident video viral where Speedy Bus hit the man shocking video on social media
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; बसने दिली धडक, टायरखाली येणार इतक्यात…, पुढच्याच क्षणी काय झालं पाहा

हेही वाचा…जेव्हा सिंहीण पिल्लांबरोबर लावते शर्यत; आईच्या पाठोपाठ सहा पिल्लांनी लावली रांग अन्… पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटते आणि मोठी दुर्घटना होता होता टळते. नंतर तरुण कारचालकावर रागावतो आणि त्याला खडे बोल सुनावतो. कारचालक आपली कार घेऊन तिथून निघून जातो. ही दुर्घटना पाहून आजूबाजूचे लोक तेथे जमा झाले आणि त्या तरुणाचे सांत्वन करून त्याला तेथून घेऊन गेले आणि येथे व्हिडीओचा शेवट झाला.

मोठ्या रस्त्यांवरील गाड्या किती वेगाने धावतात याची आपण कल्पना करू शकत नाही. वाहनचालकाची एखादी चूक आणि थेट व्यक्तीचा जीव धोक्यात असा प्रसंगही उद्भवू शकतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ThebestFigen या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेक जण हा व्हिडीओ पाहून तरुणाला लकी (Lucky) असं म्हणत आहेत. कारण कार अपघातात त्याला दुखापत झाली असती किंवा त्याचा जीवही गेला असता. पण, सुदैवाने असं काहीही झालं नाही आणि नशीब बलवत्तर म्हणून तरुणाचा वेळीच जीव वाचला आहे.

Story img Loader