Shocking video: लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. अशातच एका व्यक्तीने बँकेतून चक्क आयफोनची चोरी केली आहे. हातचलाखीने सर्वांची नजर चुकवत चोर आयफोन घेून पसार झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चोरीची पद्धत पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये चोर ग्राहक असल्याचे भासवत बँकेत आल्याचे दिसत आहे. तो फॉर्म भरण्यासाठी टेबलावर बसतो. यानंतर, संधी मिळताच आयफोन काही सेकंदात तो लंपास करतो. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून ती आता व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ghantaa नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसोबत युजरने कॅप्शन लिहिले की, “सकाळी एक व्यक्ती बँकेत खाते उघडण्यासाठी आला. त्याने आपले खातेही उघडले नाही आणि बँक कर्मचाऱ्याचा iPhone 13 चोरला.” हा व्हिडिओ आतापर्यंत ३ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
सोशल मीडियावर दररोज चोरीचे धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे पाहिल्यानंतर लोकांची चांगलीच तारांबळ उडते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> क्रूरतेचा कळस! वृद्ध सासूला जनावरासारखं मारलं; त्याने तोंड दाबलं अन् बायकोनं…संतापजनक Video व्हायरल
हा व्हायरल झालेला सीसीटीव्ही व्हिडिओ लोक सोशल मीडियावर प्रचंड शेअर करत आहेत. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्सनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. व्हायरल होत असलेल्या या पोस्टवर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, “विश्वास ठेवणे कठीण आहे.” दुसऱ्या यूजरने लिहिले की, “हा चोर पकडला गेला आहे का?” या पोस्टवर आणखी मनोरंजक प्रतिक्रिया आल्या आहेत.