डास हे कायम त्रासदायकच असतात असे नाही तर ते भीतीदायकही असू शकतात. डासांनी कानात गुणगुण करण्यापासून ते त्यांच्यामुळे होणाऱ्या डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांमुळे त्यांचा आपल्याला कायमच त्रास होतो. घरातल्या बोटावर मोजण्याइतक्या डासांमुळे जर तुम्हाला त्रास होत असेल तर मग हा व्हिडिओ पाहताना तुमचे काय होईल? याचा विचार करा. रशियामधील एका घटनेचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला किळस येऊ शकतो. ॉ
नेटीझन्समध्ये डासांचा एक व्हिडिओ भलताच चर्चेचा विषय झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस आपल्या हातांनी काहीतरी साफ करताना दिसतो. सुरुवातीला ती वाळू असल्यासारखे आपल्याला वाटते. मात्र, कॅमेरा झूम झाल्यानंतर ही वाळू नसून त्या डासांच्या आळ्या असल्याचे आपल्याला दिसते. डासांच्या इतक्या आळ्या आल्या कुठून हा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. विशेष म्हणजे डासांच्या या आळ्या पाहण्यासाठी लोकही घराबाहेर पडत आहेत. आपल्याला या गोष्टीचे आश्चर्य वाटत असले तरीही रशियामध्ये इतके डास एकावेळी दिसण्याची घटना नवीन नाही. कारण दरवर्षी येथे डासांची खास स्पर्धा भरवली जाते. या विचित्र स्पर्धेत डासांनी सर्वाधिक चावा घेतलेल्या स्पर्धकाला विजयी घोषित करण्यात येते.
डासांशी निगडीत आणखी एक घटना रशियामध्ये नुकतीच घडली होती. एका रशियन माणसाने गाडीच्या काचा उघड्या ठेवण्याची चूक केली आणि ही चूक त्याला अतिशय महागात पडली. कारच्या काचा उघड्या ठेवून तो आपल्या मित्रासोबत मासेमारी करण्यासाठी निघून गेला. जेव्हा तो परत आला तेव्हा त्याने जे पाहिले ते फारच भयानक होते. कारण त्याच्या कारमध्ये लाखो डास घोंगावत होते.