Viral Video: सोशल मीडियावर लोक प्रसिद्धीसाठी काहीतरी वेगळं करून लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधलं जाईल, यासाठी अनेकविध प्रयत्न करताना दिसतात. हल्ली त्यासाठीच मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केला जातो. आता असाच एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतोय; ज्यामध्ये नदीत मासे पकडण्यासाठी गेलेली एक व्यक्ती मासा समजून चक्क एका सापाला पकडून आणतो. हा थरारक व्हिडीओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर सापांचे विविध व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. त्यात कधी साप आणि कोंबडीचे भांडण सुरू असते; तर कधी भलामोठा साप स्वतःच्या अंड्यांचे रक्षण करताना दिसतो. नुकत्याच व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती नदीत मासे पकडण्यासाठी गेल्यावर मासा समजून चक्क भल्या मोठ्या सापाला बाहेर काढते. पुढे असं काहीतरी होतं जे पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @rafiqcomedyshow या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती नदीत मासे पकडण्यासाठी जाते. त्यानंतर काही वेळाने आपल्याला खूप मोठा मासा सापडला, असं समजून तो त्या सापाला स्वतःच्या टी-शर्टमध्ये गुंडाळतो आणि मला मोठा मासा सापडला, असं म्हणत पळत पळत पाण्याबाहेर येतो. पण बाहेर आल्यानंतर तो जेव्हा टी-शर्ट वर करतो, तेव्हा ९-१० फुटाचा भलामोठा साप त्याला दिसतो. सापाला पाहताच तो त्याला पटकन खाली झटकतो आणि घाबरून पुन्हा पाण्यात पळून जातो. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत असून, युजर्स त्यावर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

दरम्यान, आम्ही या व्हिडीओची पडताळणी केल्यावर लक्षात आले की, हा व्हिडीओ केवळ प्रसिद्धीसाठी मनोरंजन म्हणून शूट करण्यात आला आहे. या व्हिडीओतील व्यक्ती सर्पमित्र आहे. तो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सापांसोबतचे असे अनेक व्हिडीओ शेअर करीत असतो.

हेही वाचा: ‘ल्युडो’चा नाद लय बेक्कार! भरमंडपात नवरदेवाने मांडला मित्रांसोबत डाव; PHOTO पाहून युजर्स म्हणाले, “नंतर बायको त्याच्या आयुष्यासोबत खेळणार”

पाहा व्हिडीओ:

या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास मिलियन्समध्ये व्ह्युज मिळाल्या असून, चार लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत. त्यातील एका युजरने लिहिले, “भारतात असले प्रकार नेहमीच होत असतात.” दुसऱ्याने लिहिलेय, “अरे, तू डोळे बंद करून पकडलंस का त्याला.” आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “हे पाहून माझ्या अंगावर काटा आला; मग तुझं काय झालं असेल?”