काही प्राणी हे खूप शांत असतात. त्यामुळेच कदाचित त्यांना पाळीव प्राणी असं म्हटलं जातं. परंतु या पाळीव प्राण्यांना जर राग आला आणि तो राग त्यांना अनावर झाला तर एखाद्या जंगली प्राण्यापेक्षाही ते घातक ठरू शकतात. मग अशावेळी त्या चवताळलेल्या प्राण्यापासून दूर राहणंच योग्य ठरतं. परंतु काही महाभाग असेही असतात ते त्याही परिस्थितीत प्राण्यांची छेड काढतात. मग काय त्यांना आपल्या कृत्याची मोठी किंमत मोजावी लागते. असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. शांत उभा असलेल्या बैलाशी पंगा घेणं एका माणसाला चांगलंच महागात पडलं. मग काय आला अंगावर, घेतला शिंगावर या म्हणीप्रमाणे बैलाने या माणसाला चांगलीच अद्दल घडवली. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही, हे मात्र नक्की.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अवघ्या काही सेकंदांचा असला तरी त्यात जीवनाचं सार दिसून येत आहे. ‘जसे कर्म तसे फळ’ हा नियतीचा नियम सर्वांनाच माहितेय. ही म्हण सिद्ध करणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माणसाच्या कर्माचं फळ अवघ्या दोन सेकंदातच मिळालं. खरं तर, व्हायरल व्हिडीओमध्ये, एक माणूस न जाणे त्याला काय साध्य करायचं होतं आणि त्याने शांत उभा असलेल्या बैलाला शिंगांना हाताने स्पर्श करत होता. मग काय? बैलाला राग येतो आणि या माणसाला त्याच्या कर्माचं फळ मिळतं.
आणखी वाचा : Dosa Printer: कधी विचार केला होता का? ‘डोसा प्रिंटर’ही येईल, VIRAL VIDEO पाहून लोक थक्क झाले
या व्हिडीओच्या सुरुवातीला एक बैल कडेला शांत उभा असल्याचं दिसत येत आहे. तेवढ्यात काळा टी शर्ट घातलेला एक माणूस हातात काठी घेऊन त्याच्या शेजारी येतो. शांतपणे उभा असलेल्या बैलाच्या शिंगांना तो दुसऱ्या हाताने स्पर्श करत त्याची खोड काढतो. मग बैलालाही राग येतो आणि त्या माणसाला आपल्या शिंगांनी हवेत उडवून आणि धाडकन जमिनीवर आपटलं. बैलाचा राग इतक्यात शांत होत नाही. त्यानंतर बैल या माणासाल जमिनीवर चांगलंच तुडवून काढतो. हे पाहून तिथे असलेले लोक आरडाओरड करू लागतात.
बैलाशी पंगा घेणं या माणसाला चांगलंच महागात पडलं आहे. आपल्याशी पंगा घेणाऱ्या माणसाला धडा शिकवून हा बैल पुढे जातो आणि माणूस काही वेळ तसाच जमिनीवर कळवळत पडतो. हा व्हिडीओ स्पेनमधला असल्याचं सांगण्यात येतंय. स्पेनमध्ये रंगलेल्या बुलफाईट दरम्यान ही घटना घडली आहे. वळू आणि कोंबडा यांची लढाई लावणं स्पेनमध्ये कायदेशीर आहे. कारण न्यायालयाच्या निर्णयाने त्यांना देशाच्या राष्ट्रीय वारशाचा भाग म्हणून निर्धारित केले आहे. पण देशात प्राण्यांवर अत्याचार करणे बेकायदेशीर आहे.
आणखी वाचा : गाढ झोपलेल्या महिलेच्या अंगावर चढला कोब्रा, VIRAL VIDEO पाहून अंगावर काटा येईल
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
प्राणी हक्क कार्यकर्ते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिकी गेर्वाईसने ट्विटरवर धक्कादायक फुटेज शेअर केले. हे मूळतः पॅट्रिस प्रेसार्डने हा व्हिडीओ आधी शेअर केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ बघता बघता इतका व्हायरल झाला की आतापर्यंत या व्हिडीओला ३.६ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर ७२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.