Viral Video : घरातून बाहेर पाऊल ठेवले की, एखाद्या विशिष्ट ठिकाणी पोहोचण्यासाठी रस्ता हा ओलांडावा लागतो. शहरातील गल्ल्या असोत किंवा मुख्य रस्ते या ठिकाणी रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेले किंवा वाट पाहून कंटाळून अखेर गाड्यांचा वेगाचा धरबंद न ठेवता, रस्त्याच्या मध्यात जाऊन अनेक नागरिक रस्ता ओलांडून मोकळे होतात. माणसांसाठी रस्ता ओलांडणे इतके कठीण जात असेल, तर प्राण्यांच्या मनात रस्ता ओलांडताना किती धाकधूक होत असेल? तर आज व्हायरल व्हिडीओत असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. बदकाची पिल्ले व आईची रस्ता ओलांडण्यासाठी धडपड सुरू असते. तेव्हा एका तरुणानं रस्ता ओलांडताना त्यांना मार्गदर्शन केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ परदेशातला आहे. साधारणपणे बदकांची पिल्लं त्यांच्या आईच्या मागून फिरताना दिसतात. आई जी दिशा दाखवेल, ज्या रस्त्यावरून घेऊन जाईल त्याच दिशेनं ही पिल्लं पुढे जातात. तसंच काहीसं या व्हिडीओतही पाहायला मिळालं आहे. रस्त्यावरून बदकांच्या पिल्लांची आई आणि तिच्यामागोमाग ती चार-पाच पिल्लं हळूहळू येत होती. रस्त्यावर गाड्यांची रहदारी होती. त्यामुळे रस्ता ओलांडताना अडचण येत होती. एका तरुणानं हे पाहिलं आणि त्यांना मदत करण्याचं ठरवलं. तरुणानं बदकांच्या पिल्लांना केलेलं मार्गदर्शन एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून पाहा.

हेही वाचा…पाकिटमारांची दादागिरी, बसमधील प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण, VIDEO पाहून व्हाल थक्क

व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा…

https://www.instagram.com/reel/C6jgzlHOAVl/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading

रस्ता ओलांडताना अनेकदा माणसांनाच भीती वाटते. कारण- कोणत्या वेगानं कोणती गाडी येईल याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. त्यामुळे सिग्नल लागल्यावरच रस्ता ओलांडणं योग्य ठरतं. तसंच या व्हिडीओतसुद्धा पाहायला मिळालं आहे. एक तरुण बदकाच्या पिल्लांना मदत करताना दिसत आहे. रस्ता ओलांडताना कोणतंही वाहन त्यांच्या वाटेत मधेच पुढे येऊन, अपघाताचा संभाव्य धोका उदभवू नये म्हणून गाड्यांना हात दाखवीत, बदकाच्या पिल्लांच्या समूहाला पदपथावर सुखरूप पोहोचवतो आहे. या दृश्याचे साक्षीदार नागरिक तरुणाकडे कौतुकाने बघत आहेत.

सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @goodnews_movement यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘चला एकमेकांची काळजी घेऊ या’, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. रस्ता ओलांडताना आई व तिची पिल्लं घुटमळत होती. तेव्हा अशा परिस्थितीत एका तरुणानं प्राण्यांबद्दल दया दाखविण्याचं धाडस केलं आणि मार्गदर्शन करीत त्यांना रस्ता ओलांडून पलीकडील पदपथावर सुखरूप पोहोचवलं. हा व्हिडीओ पाहून नेटकरी कमेंट्समध्ये विविध शब्दांत या व्हिडीओचे कौतुक करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video man walking close to a group of a mother duck and her ducklings and guiding them across the street asp