Viral Video: समाजमाध्यम वापरकर्त्यांसाठी रस्त्यावर डान्स करणाऱ्यांचे विविध व्हायरल व्हिडीओ पाहणं नवीन गोष्ट नाही. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. कधी मुंबई लोकलमध्ये, तर कधी दिल्ली मेट्रोमध्ये रील्स बनवणाऱ्यांचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. त्यातील काही व्हिडीओ पाहण्यासारखे असतात, तर काही व्हिडीओ पाहून अक्षरशः डोक्यात तिडीक जाते. अशा व्हिडीओंवर नेटकरीही खूप संताप व्यक्त करताना दिसतात. दरम्यान, आताही असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
डान्स करणं, गाणं गाणं अशा प्रकारच्या कला सादर करणं वाईट गोष्ट नाही. पण, हल्ली लोकांना आपली कला कुठे, कशी सादर करावी याचे भान राहिलेले नाही. आपल्या कलेचा दर्जा राखून ठेवायला हवा, याची त्यांना कल्पनाच नसते. कला सादर करणाऱ्या व्यक्तीला लोकांनी आपल्याला दाद द्यावी, कौतुक करावं, असं वाटतं. पण, त्यांची ही सार्वजनिक ठिकाणी सादर होणारी कला अनेकांसाठी अडचण निर्माण करते, ज्यामुळे लोक दाद देण्याऐवजी संताप व्यक्त करतात. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील तरुणीबरोबर असंच घडल्याचे दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका प्लॅटफॉर्मवर ट्रेन काही वेळासाठी थांबली असून यावेळी ट्रेनमधून बाहेर येता येता एक तरुणी रील बनविण्यासाठी एका गाण्यावर डान्स करायला सुरुवात करते. यावेळी प्लॅटफॉर्मवर काही पुरुष थांबलेले होते, तरुणी त्यांच्या अगदी जवळून डान्स करत करत पुढे जाते. यावेळी तिथली एक व्यक्ती तिला जोरात धक्का मारतो. त्यावर ती चिडून, त्याला “वेडा झालास का मी व्हिडीओ बनवतेय”, असं म्हणते. त्यावर तो तिला, ही नाचायची जागा नाही, रेल्वे स्टेशन आहे” , असे सुनावतो.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @just_crazy_thingss या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत अनेक एक दशलक्षांहून अधिक व्ह्यूज आणि एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “मला बरं वाटलं काका”, तर दुसऱ्यानं लिहिलंय, “असं पाहिजे या रस्त्यावर नाचणाऱ्यांना”. तर तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “मूर्ख मुलगी”.