Viral Video of Spider Man Fan Cinema Hall : ‘स्पायडर मॅन नो वे होम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. भारतात चार भाषांमध्ये रिलीज झालेल्या स्पायडर मॅन- नो वे होम चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी ३२ कोटींचा व्यवसाय केला होता. अवघ्या चार दिवसात स्पायडरमॅननं १०० कोटींचा पल्ला गाठलाय. काही दिवसांवर आलेलं ख्रिसमस आणि त्यानंतर लगेचच येणारं नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये हा चित्रपट जणू प्रेक्षकांसाठी एक ट्रीट ठरलाय. सोशल मीडियावर सुद्धा या चित्रपटावर वेगवेगळे मीम्स आणि मजेदार व्हिडीओंचा महापूर आलेला पहायला मिळतोय. त्यातल्याच एक मजेदार व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये स्पायडर मॅन फॅन चित्रपटाचे तिकीट खरेदी करताना दिसून येत आहे. ‘स्पायडर मॅन नो वे होम’ हा त्याचा आवडता चित्रपट पाहण्यासाठी तो आला होता. पण, सिनेमागृहात त्याच्यासोबत असं काही घडले की, ऐकून चाहत्यांनाही धक्का बसला.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक व्यक्ती चेहऱ्यावर स्पायडर मॅनचा मास्क घालून तिकीट काउंटरवर बसलेल्या महिलेकडे जातो. त्याच्या चेहऱ्यावर स्पायडर मॅनचा मास्क घातलेला पाहून कुणालाही अंदाज येईल की हा स्पायडर मॅनचा चाहता आहे. जगभरात ‘स्पायडर मॅन नो वे होम’ चित्रपटाचा गाजावाजा सुरू आहे आणि तिकीट काउंटवर असलेल्या या महिलेने स्पायडर मॅन फॅनला जो प्रश्न केला तो ऐकून केवळ हा फॅनच नव्हे तर तुम्ही सुद्धा चक्रावून जाल.

आणखी वाचा : अरेरे! या आजोबांना काय दुर्बुद्धी सुचली आणि शांत उभा असलेल्या बैलाला काठी मारली…मग काय झालं पुढे, पाहा हा VIRAL VIDEO

हा स्पायडर मॅन फॅन जेव्हा तिकीट घेण्यासाठी जातो तेव्हा तिकीट काउंटवर असलेल्या महिलेने त्याला विचारलं, “कोणत्या चित्रपटाचं तिकीट हवंय?” हे ऐकून कॅमेरा स्पायडर मॅनचा मास्क घातलेल्या व्यक्तीकडे फिरतो. त्याच्या चेहऱ्यावर स्पायडर मॅनचा मास्क असला तरी महिलेचा हा प्रश्न ऐकून त्याला किती मोठा धक्का बसला असेल याची कल्पना हा व्हिडीओ पाहून येत आहे. तिकीट काउंटरवर असलेल्या या महिलेचा प्रश्न ऐकून तुम्हाही चकित व्हाल. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

आणखी वाचा : आईस्क्रीमवाल्याच्या अंतिम यात्रेचा VIRAL VIDEO पाहून तुम्ही सुद्धा भावूक व्हाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Bride Groom Video : नवरा-नवरीचा सुरू होता रोमान्स; मध्येच कुत्र्याने मारली एन्ट्री आणि…

हा मजेदार व्हिडीओ ‘synpct’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा विनोदी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख ३७ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर साडे चार हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओ लाईक केलंय. लोक या व्हिडीओला आनंद घेत असून एकदा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याचा मोह मात्र लोकांना आवरता येत नाहीय.

आणखी वाचा : डान्स स्टेप्स कॉपी करायला निघाली आणि धपकन पडली, VIRAL VIDEO पाहून तुम्ही पोट धरून हसाल

या मजेदार व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या प्रतिकिया शेअर करताना दिसून येत आहेत. जर त्या व्यक्तीने स्पायडर-मॅनचा मास्क घातला असेल तर तो स्पायडर मॅन नो वे होम हाच चित्रपट पाहण्यासाठी आला असणार, हे अगदी स्वाभाविक आहे. असं असूनही या महिलेच्या प्रश्नाने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. महिलेच्या या प्रश्नावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडीओवरील कमेंट्स देखील वाचण्यासारख्या आहेत.

बसला. महिलेच्या या प्रश्नावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडीओवरील कमेंट्स देखील वाचण्यासारख्या आहेत.

Story img Loader