Viral Video of Spider Man Fan Cinema Hall : ‘स्पायडर मॅन नो वे होम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. भारतात चार भाषांमध्ये रिलीज झालेल्या स्पायडर मॅन- नो वे होम चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी ३२ कोटींचा व्यवसाय केला होता. अवघ्या चार दिवसात स्पायडरमॅननं १०० कोटींचा पल्ला गाठलाय. काही दिवसांवर आलेलं ख्रिसमस आणि त्यानंतर लगेचच येणारं नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये हा चित्रपट जणू प्रेक्षकांसाठी एक ट्रीट ठरलाय. सोशल मीडियावर सुद्धा या चित्रपटावर वेगवेगळे मीम्स आणि मजेदार व्हिडीओंचा महापूर आलेला पहायला मिळतोय. त्यातल्याच एक मजेदार व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये स्पायडर मॅन फॅन चित्रपटाचे तिकीट खरेदी करताना दिसून येत आहे. ‘स्पायडर मॅन नो वे होम’ हा त्याचा आवडता चित्रपट पाहण्यासाठी तो आला होता. पण, सिनेमागृहात त्याच्यासोबत असं काही घडले की, ऐकून चाहत्यांनाही धक्का बसला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा