कोरोनाच्या काळात अनेक संस्थांनी वर्क फ्रॉम-होम कल्चर सुरू केले, जे बऱ्याच ठिकाणी आजपर्यंतही सुरू आहे. जगभरच वर्क फ्रॉम होम कार्यसंस्कृती रुळली आहे. नोकरी शोधणार्‍यांची वाढती संख्या ही कायमस्वरूपी घरून काम करणार्‍या म्हणजे वर्क फ्रॉम होम असणाऱ्या कंपन्यांची निवड करण्यास प्राधान्य देते. वर्क फ्रॉम होम आपण घर बसल्या निवांत करु शकतो. प्रवासाचा त्रास नाही, गर्दीचा विषय नाही आण शिवाय वेळही वाचतो, त्यामुळे वर्क फॉर्म होमसाठी आजकाल सगळेच आग्रही असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आतापर्यंत तुम्ही वर्क होम करणारी मंडळी फक्त घरातच नाही तर इतर ठिकाणी बाहेरुनही ऑफिसची कामं करताना पाहिली असतील. कोणी गार्डनमध्ये बसून काम करत तर कोणी फिरायला गेल्यावर त्या त्या ठिकाणाहूनही कामं करतात. मात्र एका पठ्ठ्यानं कमालच केलीय, हा तरुण चक्क थिएटरमध्ये चित्रपट पाहत पाहत काम करतोय. विश्वास बसत नाही ना. पण या तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वर्क फॉर्म थिएटर –

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका बंगरुळमधल्या थिएटरमध्ये संपूर्ण काळोख असताना एक तरुण स्वत:चा लॅपटॉप उघडून बसला आहे. चित्रपट सुरु होण्याआधी हा तरुण लॅपटॉपमध्ये काहीतरी काम करताना दिसत आहे. या तरुणाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. थिएटरमध्ये असलेल्याच कुणीतरी या तरुणाचा हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर टाकला. आतापर्यंत ऑफिसच्या कामांच्या डेडलाईनसाठी अनेकांना काम करताना पाहिलं असेल, मात्र चक्क थिएटरमध्ये बसून काम करणारा हा पहिलाच तरुण असावा.

पाहा व्हिडीओ – जग भ्रमंतीसाठी बूक केले १७ लाखांचे ड्रीम क्रूझ; जहाज व्यक्तीला न घेताच रवाना

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर एकदा एखादी गोष्ट आली की ती व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. त्यातलाच हा एक व्हिडीओ. या व्हिडीओवर नेटकरीही अनेक मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. त्यातील एकानं म्हंटलंय..जेव्हा दोन्ही महत्त्वाचं असतं तेव्हा असे पर्याय काढावे लागतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video man working on laptop while watching a film in theatre srk
Show comments