Tulsi vivah Viral Video: दिवाळी पार पडली की, अनेक जण तुळशी विवाहाची आतुरतेने वाट पाहतात. काही दिवसांपूर्वी ठिकठिकाणी तुळशी विवाह पार पडले. सध्या सोशल मीडियावर तुळशी विवाहाचे अनेक नवनवीन व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यात तुळशी विवाहाचे सुंदर फोटो, व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. आता असाच एक सुंदर व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे; ज्यात एक चिमुकला असं काहीतरी करताना दिसतोय, जे पाहून तुम्ही अवाक् व्हाल.

आजकालची लहान मुलं खूप अॅडव्हान्स झाली आहेत. बदलत्या काळानुसार आपली पुढची पिढी आपली संस्कृती किती प्रमाणात जपेल. सण-समारंभ कसे साजरे करील. याबाबत अनेकांकडून काळजी व्यक्त केली जात आहे. पण, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळत आहे. या व्हायरल व्हिडीओतील चिमुकला चक्क मंगलाष्टका गाताना दिसतोय; जे पाहून नेटकरी त्याचं कौतुक करीत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तुळशी विवाहासाठी सर्व जण अंगणातल्या तुळशीजवळ उभे आहेत. या प्रसंगी एक चिमुकला पाटावर उभा राहून मंगलाष्टके गाताना दिसतोय. चिमुकल्याच्या तोंडून मंगलाष्टका ऐकल्यानंतर त्याच्या पाठीमागे आणि आसपास उभी असलेली इतर मंडळीही त्याच्याकडे कौतुकाने पाहत उभी आहेत. चिमुकल्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: ‘शेवटी मृत्यू अटळ आहे…’ सिंहाच्या शावकांचा जिराफावर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @hridhanurunkar_the_dramebaaz या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ९३ लाखांहून अधिक व्ह्युज आणि चार हजारांहून अधिक लाइक्सही मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर एका युजरने लिहिलेय, “रिधान गुरुजी उद्या साताऱ्याला या आणि दक्षिणाही सांगा किती घेता ते.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “आज काहीतरी छान दिसलं इन्स्टावर.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “पहिल्यांदा उच्चारांतून मंगलाष्टकांचे बोल व्यवस्थित ऐकायला मिळाले… नाही तर कोणाच्या लग्नात गेलो की, फक्त शुभ मंगल सावधान एवढंच समजायचं.” आणखी एकाने लिहिलेय, “कायपण म्हणा भटजी बाकी शोभतोय.”

Story img Loader