Viral Video: सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. या दिवसांत लग्नातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामध्ये लग्नातील विविध पद्धती, परंपरा, उखाणे यांव्यतिरिक्त डान्स आणि गमतीजमतीही पाहायला मिळतात. त्याशिवाय आजकालच्या लग्नांमध्ये वधू-वर यांच्याव्यतिरिक्त त्यांचे कुटुंबीयदेखील रील बनविताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर कधी कुठलं गाणं व्हायरल होईल ते सांगता येत नाही. जेव्हापासून रील्स बनविण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे, तेव्हापासून सतत विविध भाषांतील, विविध देशांतील नवनवीन गाणी व्हायरल होतात; ज्यावर लाखो लोक रील बनवतात. इतकेच नव्हे, तर ही गाणी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रम, लग्न समारंभांमध्येही लावली जातात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी झापुकझुपूक हे गाणं सोशल मीडियावर खूप व्हायरल झालं होतं. या गाण्यानंही सोशल मीडियावर अनेकांना वेड लावलं आहे. या गाण्यावर लाखो लोकांनी रील्स बनवून, सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. अशातच आता या गाण्यावरची एक नवी रील व्हायरल होतेय, ज्यात लग्नाला आलेले वऱ्हाडी या गाण्यावर रील बनविताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नमंडपामध्ये बऱ्याच महिला आणि काही पुरुष बसले आहेत. त्यावेळी झापुकझुपूक हे गाणं लावलं जातं. यावेळी ते सर्व जण या गाण्यावरील स्टेप करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @dalpat_malviya या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यावर दोन लाखांहून अधिक व्ह्युज आणि १० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक नेटकरी यावर विविध कमेंट्स करताना दिसत आहेत.
एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “मराठी, मारवाडी भाऊ-भाऊ.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “महाराष्ट्र Always Rock.” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “व्वा! खूप मस्त वाटलं हे पाहून.”