Python Climbing Tree : आपण सर्वांनी इंटरनेटवर बरेच व्हिडीओ पाहिले असतील. काही मजेदार असतात तर काही आश्चर्यकारक असतात. तुम्ही बऱ्याचदा अजगराला शिकार करताना, प्राणी-पक्ष्यांना जिवंत गिळताना किंवा आराम करताना पाहिलं असेल, पण आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अजगर कोणत्या एका उंच ताडाच्या झाडावर सरसर चढताना दिसून आला आहे. अगदी एका रेषेत वाढत गेलेल्या या झाडावर चढणे ही सोपी गोष्ट नाही, कुठलाही प्राणी असं करु शकत नाही, पण या अजगराला ते चांगलं जमलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहे, जो लोकांना आवडतानाही दिसतो आहे.

आजपर्यंत तुम्ही सापाला शिकार करताना पाहिलं असेल, शिकार गिळतानाचे भयंकर व्हिडीओ देखील पाहिले असतील. अजगर हा सरपटणारा प्राणी…अजगर इतर वन्य प्राण्यांसारखा झाडावर सुद्धा सरसर चढू शकतो, असं आम्ही सांगितलं तर कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. एका उंच ताडाच्या झाडावर सरसर चढणाऱ्या अजगराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. कारण ताडाच्या झाडावर चढणं ही काही साधी गोष्ट नाही. ताडाच्या झाडावर चढण्यासाठी माणसाला सुद्धा काही यंत्रांचा वापर करावा लागतो. पण या व्हिडीओमधला अजगर कोणत्याही यंत्राचा वापर न करता सरसर चढतोय. वजनाने इतका अवजड अजगर झाडावर कसा काय चढला असेल? असा प्रश्न प्रत्येकाला पडू लागला आहे.

आणखी वाचा : शेकडो मगरींनी एकत्र येऊन शहरावर केला हल्ला? VIRAL VIDEO मुळे लोकांमध्ये दहशत

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अजगर आधी कॉइलवर आदळतो, नंतर काही सेकंदात तो सरसर झाडावर चढू लागतो. अजगर सरपटणारा प्राणी असल्याने झाडावर चढण्यासाठी त्याने एक अनोखी शक्कल लढवली. ज्या पद्धतीने तो आपल्या शिकारभोवती शरीराने विळखा घालतो अगदी त्याच पद्धतीने त्याने झाडावर विळखा घालत वर वर सरकतो. नंतर डोके वर काढून पुन्हा झाडाला तीन वेटोळे घालून सफाईदारपणे वर चढत आहे. अजगराची झाडावर चढण्याची ही पद्धत पाहून तुम्हीही घाबरून जाल.

आणखी वाचा : Taiwan Earthquake: भूकंपाचा कहर, ट्रेनही अगदी खेळण्यासारखी पटरीवर हादरली, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : पाण्याखाली ‘मूनवॉक’ करणाऱ्या मुलाचा VIDEO VIRAL, परफॉर्मन्स पाहून थक्क व्हाल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत अद्याप काही माहिती कळू शकली नाही. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या विशालकाय अजगराचं इतकं वजन मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा हा अजगर सरळ उंच झाडावर चढला. हा व्हिडीओ जितका हैराण करणारा आहे, तितकाच अंगावर काटा आणणारा देखील आहे.

Story img Loader