Viral Video: सोशल मीडियाचं जग खूप अनोखं आहे. कारण येथे दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात एकीकडे प्रसिद्ध होण्यासाठी विचित्र स्टंट तर दुसरीकडे लोकांचे नवनवीन कौशल्य पाहायला मिळतात. तर आज असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती वाद्यांचे आवाज तोंडाने काढून प्रवाशांना मनमुराद हसवत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रत्येक व्यक्ती किमान एक कौशल्य घेऊन जन्माला येतो. ते कौशल्य आपल्याला अचूक ओळखता आलं की जीवनात त्याचा योग्य वापर करता येतो. अशी अनेक कलाकार मंडळी आपण आजूबाजूला पाहत असतो. विशेष म्हणजे वाद्य हाताने वाजविणारे कलाकार तुम्ही आजवर पाहिले असतील. पण, या व्यक्तीकडे एक आगळीवेगळी कलादेखील आहे, ज्याने तोंडावाटे विविध वाद्य वाजवून दाखवली आहेत. एकदा पाहाच या व्यक्तीचे अनोखे कौशल्य.

हेही वाचा…घृणास्पद! मेट्रो स्थानकावर व्यक्ती तंबाखू खाऊन थुंकला महिलेच्या पँटवर; वाचा नेमकं काय घडलं?

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, व्यक्ती तोंडाने आवाज काढून व्हायोलिन, सितार, शहनाईसारखी वाद्ये वाजवत आहे व आपले टॅलेंट दाखवत आहे. व्यक्तीने स्वतःचे नाक दाबून शहनाईचा असा हुबेहूब आवाज काढला आहे की, जणू तुम्ही लग्न मंडपात उभे आहात असे तुम्हाला वाटेल. व्यक्तीच्या वाद्यांच्या या सादरीकरणादरम्यान अनेक प्रवासी त्याचं टाळ्या वाजवत कौतुकदेखील करत आहेत.

व्हायरल व्हिडीओ ट्रेनमधील आहे. ट्रेनमध्ये ही व्यक्ती दोन्ही सीटच्या मध्ये जी जागा असते तिथे उभी राहून वाद्यांचा विविध आवाज तोंडाने गुणगुणत मनोरंजन करताना दिसत आहे. तसेच ट्रेनमधून प्रवास करणारे प्रवासी या व्यक्तीच्या कलेला दाद देताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @TechAndCricket या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच नेटकरी व्यक्तीच्या या अद्भुत कौशल्याची कमेंटमध्ये प्रशंसा करताना दिसून आले आहेत.