Viral Video: “प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं”, हे वाक्य तुम्ही अनेकदा कुठे ना कुठेतरी ऐकलंच असेल. आपल्या आवडीच्या व्यक्तीवर प्रेम करण्याची प्रत्येक व्यक्तीची पद्धत वेगळी असते. अनेकदा प्रेम सतत बोलून दाखवल्यानं किंवा त्या व्यक्तीसाठी सतत काहीतरी स्पेशल केल्यानं आहे, असं वाटतं. परंतु, कधी कधी काहीही न बोलता फक्त एकमेकांबरोबर आयुष्यातील सुख-दुःखं, खंबीरपणे साथ देण्यालाही प्रेमच म्हटलं जातं. प्रेम ही एक गोड भावना आहे. जी व्यक्ती प्रेमात पडते, ती प्रेम करणाऱ्या व्यक्तीसाठी काहीही करायला तयार असते. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात प्रेमात पडलेला तो तिच्यासाठी काहीतरी खरेदी करताना दिसतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

समाजमाध्यमांवर वारंवार विविध विषयांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यातील काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करतात, हसवतात, तर काही व्हिडीओ पाहून आपण आनंदी होतो. सध्या असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे, जो पाहून नेटकरी आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जण ऑफिसवरून घरी जाता जाता वाटेत लागलेल्या एका कपड्यांच्या स्टॉलवर त्याच्या पत्नीसाठी खरेदी करताना दिसतोय. त्यावेळी आणखी एक जण पत्नीसाठी खरेदी करताना दिसतो आहे.

पाहा व्हिडीओ

हा सोशल मीडियावर खूप चर्चेत असलेला व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kaahii_tarii_mnaatl या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर दोन दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक नेटकरी यावर विविध कमेंट्स करताना दिसत आहेत.

एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “जेव्हा माणूस शरीरावर प्रेम न करता व्यक्तीवर प्रेम करतो.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “मला गर्लफ्रेंड तर नाही, पण मी आईसाठी चांगली साडी घेतो.” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “मलापण असाच जोडीदार मिळाला आहे.”