Delhi metro viral video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र सध्या दिल्ली मेट्रोतील व्हिडिओची संख्या वाढली आहे. दिल्ली मेट्रोतून दररोज अनेक व्हिडिओ समोर येत असतात. हे व्हिडिओ नेहमी वादग्रस्त ठरत असतात. सध्या तर या व्हिडिओची मालिकाच सुरु झाली आहे. असे अनेक व्हिडिओ आतापर्यंत दिल्ली मेट्रोतून व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमुळे मोठा वाद देखील निर्माण झाला होता. दररोज दिल्ली मेट्रोचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. दरम्यान दिल्ली मेट्रोतला आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल आता हेच पाहायचं राहिलं होतं..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुणी काय कपडे परिधान करावेत, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. मात्र, असे अनेक जण आहेत जे सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी विचित्र गोष्टी करत असतात. आतापर्यंत उर्फी आणि दिल्ली मेट्रोतील बिकनी गर्ल चर्चेत होती, मात्र आता दिल्ली मेट्रोमधील दोन तरुणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आता समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दोन तरुण मुलींसारखे स्कर्ट घालून दिल्ली मेट्रोमध्ये फिरताना दिसत आहेत. इतकंच नाही तर त्याने काळा चष्मा आणि निळ्या रंगाचा टी-शर्टही घातलाय. तर त्याच्यासोबत चालणाऱ्या मुलानेही असाच ड्रेस परिधान केला होता. बिकिनी गर्लनंतर मुलांचा असा पेहराव पाहून लोकांनी कपाळाला हात लावला आहे. मुलांच्या या पोशाखाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. 

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – पेन्शनसाठी आजीबाईचा संघर्ष: खुर्चीचा आधार, अनवाणी पायांनी पायपीट! निर्मला सितारामन यांनी घेतली दखल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आतापर्यंत व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. कुणी ‘मी पाहिलेल्या विचित्र गोष्टींपैकी ही एक आहे’, असं म्हणतंय, तर काहींनी ते भन्नाट असल्याचंही म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video men wearing denim skirt in delhi metro srk
Show comments