Viral Video: प्रेम कधी कोणाला कोणत्या वयात होईल हे सांगता येत नाही. कॉलेजमध्ये गेल्यानंतर अनेक किशोर वयातील मुलं-मुली प्रेमात पडतात. आयुष्यभर एकमेकांबरोबर राहू असं वचन एकमेकांना देतात. पण, नंतर हे प्रेम दुरावते. खरं तर यामध्ये अनेकांना गैरसमज होतो की, एखादी व्यक्ती आपल्याला आवडते म्हणजे आपण त्या व्यक्तीवर प्रेमचं करतो असं वाटतं. परंतु, कधी कधी हे प्रेम नसून आकर्षण असतं आणि ज्या नात्यामध्ये फक्त आकर्षण असतं ते नातं फार काळ टिकत नाही. परंतु, या सगळ्याची जाणीव वयानुसार आपोआप येऊ लागते. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर अशाच एका कॉलेजमधील गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
अनेकदा सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यातील काही व्हिडीओ ठरवून लोकांच्या मनोरंजनासाठी आणि माहिती मिळवून देण्यासाठी बनवले जातात, तर काही व्हिडीओ अनपेक्षित घडलेल्या घटनांचे असतात, ज्यात रस्त्यांवरील अपघात अशा विविध घटना असतात. परंतु, आता असा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात एका गार्डनमध्ये फिरणाऱ्या अल्पवयीन गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंडबरोबर असं काहीतरी करण्यात आलं, जे पाहून तुम्हीही कपाळावर हात माराल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका गार्डनमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड एकमेकांबरोबर फिरत असताना तिथे काही व्यक्ती येतात आणि अल्पवयीन बॉयफ्रेंडला गर्लफ्रेंडच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला सांगतात. यावेळी त्यातील एक जण हा व्हिडीओदेखील शूट करतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @idhar_dekho_bhai या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला एक मिलियनहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “असंच पाहिजे यांना, आता फिरणार नाहीत गार्डनमध्ये.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “हा अतिरेक आहे, असं करायला नको होतं”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “प्रेम करणं गुन्हा नाही, तुमची मुलंपण करतच असतील ना कोणावर तरी प्रेम.”