Viral Video : आपण सर्वांनीच तंत्रज्ञानाला आपल्या जीवनाचा एक भाग बनवला आहे. आपल्याला जेवढ्या सुविधा मिळतील तेवढ्या नेहमी कमीच वाटतात. मात्र, याच सुविधा कधी कधी आपल्या जीवावरही बेतू शकतात. लिफ्टमुळे आपला बराच वेळ वाचतो. हल्ली उंच उंच इमारतींना लिफ्टशिवाय पर्याय नाही. मात्र, याच लिफ्टसंबंधित दुर्घटना घडल्याचे आपल्याला अनेकदा पाहायला वा वाचायला मिळते. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये घडलीय; मात्र सुदैवाने यामध्ये लहान मुलगी थोडक्यात बचावली आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुधवारी लखनौमध्ये एक मोठी दुर्घटना टळली आहे. एक लहान मुलगी लखनौच्या गौराबाग भागात एका बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये अडकली होती आणि ती बराच वेळ मदतीसाठी ओरडत होती. बाहेर निघण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करीत होती. यावेळी लिफ्टमधील सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हिरव्या रंगाच्या गणवेशात ही मुलगी दिसत आहे. यादरम्यान ती खूप घाबरली असून, लिफ्टच्या दरवाजावर ठोकून, मदतीसाठी ओरडताना दिसत आहे. यावेळी तिने लिफ्टमधील कॅमेऱ्यामध्ये बघून हात जोडून मदतही मागितली, हे पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती स्वत:ही लिफ्टचा दरवाजा खोलण्यासाठी ताकद लावत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही आता लहान मुलांना एकटे लिफ्टमध्ये सोडणार नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: लग्नसोहळा दु:खात बदलला; हॉलमध्ये आगीचा भडका, १०० वऱ्हाड्यांचा होरपळून मृत्यू, १५० जखमी

अखेर काही वेळानंतर या मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली. मुलगी आता व्यवस्थित असल्याची माहिती आहे. बऱ्याचदा लिफ्टच्या बाहेर सूचना लिहिलेल्या असतात, लहान मुलांना एकटे लिफ्टमध्ये सोडू नका. मात्र, तरीही पालक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि याचे कधी कधी गंभीर परिणाम भोगावे लागतात. हा व्हिडीओ @Arv_Ind_Chauhan या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, तो व्हायरल झाला. नेटकऱ्यांनीही वेगवगळ्या प्रतिक्रिया यावर दिल्या आहेत. एका युजरने या घटनेबद्दल पालकांना जबाबदार धरले आहे. तर दुसऱ्या युजरने चिमुकलीच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video minor girl gets trapped in lift for 20 minutes in lucknow apartment screams pleads for help video viral srk