Vinay Narwal नौदल अधिकारी विनय नरवाल यांचा जम्मू काश्मीरच्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांच लग्न सात दिवसांपूर्वी हिमांशीसह झालं होतं. दहशतवादी हल्ल्याच्या काही काळापूर्वी लेफ्टनंट विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी सोवामी यांचे शेवटचे क्षण असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो खोटा आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारे जोडपे हे नौदल अधिकारी विनय नरवाल आणि त्यांच्या पत्नी नाही तर तो व्हिडीओ दुसऱ्याच जोडप्याचा आहे.
काश्मीरच्या बैसरन व्हॅलीच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर शुट केलेल्या १९ सेकंदांच्या या क्लिपमध्ये एक जोडपे लोकप्रिय कोक स्टुडिओ ट्रॅक झोलवर नाचताना दिसत आहे. हाच व्हिडिओ वापरून सोशल मीडियावर अनेक पोस्टमध्ये २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यापूर्वी लेफ्टनंट आणि त्यांच्या पत्नीचा हा “शेवटचा व्हिडिओ” असल्याचा खोटा दावा करण्यात आला होता.
व्हायरल व्हिडीओ ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर आशिष सेहरावत आणि यशिका शर्मा यांचा आहे. या जोडप्याने स्वत: पुढे येऊन याबाबत माहिती दिली आहे. या दोघांनी HT.com ला माहिती देताना खात्री केली की, व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारे जोडपे ते स्वत: आहेत. सेहरावतच्या मते, हे फुटेज प्रत्यक्षात १४ एप्रिल रोजी त्यांच्या काश्मीरच्या प्रवासादरम्यान शूट करण्यात आले होते. त्यांनी दाव्याचे समर्थन करण्यासाठी व्हिडिओचा मेटाडेटा दाखवणारा स्क्रीनशॉट देखील दिला.

हा व्हिडिओ २२ एप्रिल रोजी अपलोड करण्यात आला होता, निव्वळ योगायोगाने हल्ला झाला त्याच दिवशी. नंतर तो काढून टाकण्यात आला. त्यानंतरच्या पोस्टमध्ये, आशिष आणि यशिका यांनी परिस्थितीबद्दल बोलताना ते सुरक्षित असल्याची पुष्टी केली आणि स्पष्टपणे म्हटले: “आम्ही जिवंत आहोत.”
“नमस्कार मित्रांनो, आम्ही जिवंत आहोत आणि आम्ही पोस्ट केलेल्या अलीकडील व्हिडिओबद्दल बोलू इच्छित होतो ज्याने दुर्दैवाने खूप द्वेष निर्माण केला, ज्यामुळे आम्ही तो हटवला. दुर्दैवाने, व्हिडिओचा अनेक पेज आणि वृत्तवाहिन्यांद्वारे गैरवापर करण्यात आला, खोटा दावा केला की,”हा दिवंगत विनय सर आणि त्यांच्या पत्नीचा शेवटचा व्हिडिओ होता,” असे या जोडप्याने कॅप्शनमध्ये लिहिले.
व्हिडिओ पहा:
“आम्ही त्या घटनेच्यावेळी तिथे नव्हतो, पण मला माहित नाही की, आमचा व्हिडीओ कसा किंवा कोणत्या माध्यमांनी उचलला आणि आमचा व्हिडिओ सर्व वृत्तवाहिन्यांवर व्हायरल नौदल अधिकारी विनय नरवाल व त्यांच्या पत्नीचा यांच्या नावाने व्हायरल झाला आहे,” असे शर्मा पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत.
“भारतातील माध्यम संस्था कसे काम करते हे मला माहित नाही, परंतु आम्ही सकाळपासून खूप अडचणीत आहोत. कृपया, कुटुंबाप्रती माझे संवेदना आणि सहानुभूती व्यक्त करतो पण आम्ही जिवंत आहोत,” ती म्हणाली.
त्यांच्या व्हिडिओच्या शेवटी उजवीकडे, जोडप्याने भारतातील प्रमुख माध्यमांचे स्क्रीनशॉट दाखवले ज्यात जोडप्याला दिवंगत नौदल अधिकारी विनय नरवाल आणि त्यांच्या पत्नीचा उल्लेख आहे. पण हे दावे खोटे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“नौदल अधिकारी विनय नरवाल त्यांच्या कुटुंबियांबद्दल आमच्या मनापासून संवेदना आहेत. आमच्या व्हिडिओचा गैरवापर करणाऱ्या कोणत्याही पेजची तक्रार करा, कारण ते खरोखरच निराशाजनक आहे. प्रतिष्ठित न्यूज चॅनेल आणि पेज देखील व्ह्यूजसाठी असत्यापित कंटेंट वापरत आहेत हे पाहून धक्का बसतो, ज्यामुळे बातम्यांच्या स्रोतांवर विश्वास ठेवणे कठीण होते,” असे कॅप्शनमध्ये म्हटले आहे.