Viral Video: कुत्रा आणि मांजर हे अनेकांचे आवडते प्राणी आहेत. त्यांच्या या पाळीव प्राण्यांवर लोकांचे जीवापाड प्रेम असते. या पाळीव प्राण्यांना अनेकदा घरातील इतर सदस्यांपेक्षाही उत्तम वागणूक दिली जाते. त्यांची आवड-निवड पूर्ण केली जाते. हल्ली या दोन्ही प्राण्यांचे वाढदिवसदेखील आवडीने साजरे केले जातात, अशा अनेक कौतुक सोहळ्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात; शिवाय या लाडक्या प्राण्यांचे त्यांच्या घरातील अनेक मजेशीर व्हिडीओदेखील समाजमाध्यमांवर खूप व्हायरल होत असतात. आता असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीदेखील पोट धरून हसाल.

प्राणीदेखील माणसांप्रमाणेच खूप हुशार असतात. त्यांना त्यांचे आवडते पदार्थ, आवडीच्या पदार्थांचा गंध लगेच ओळखता येतो. घरात एखादा पदार्थ बनवला तरी यांना सर्वात आधी ते कळतं. या व्हायरल व्हिडीओमध्येही असंच काहीतरी होत असल्याचं दिसत आहे, जे पाहून तुम्हीही मोठमोठ्याने हसाल.

Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
makar sankranti birds emotional video
“पतंग नवीन खरेदी कराल; पण त्यांच्या जीवाचं काय?” मकर संक्रांतीचा ‘हा’ आनंद कोणाला तरी कायमचं दुख देऊन जातोय; पाहा हृदयद्रावक video
Viral Video Shows Father And Daughter love
‘काय ते छोटे छोटे घास, काय ते तोंड पुसणे…’ एकाच ताटात बाबांबरोबर जेवणारी लेक; पहिला घास लेकीला, तर दुसरा… VIDEO व्हायरल
Vloggers Surprise Blinkit Swiggy Delivery Riders With Gifts
एक ही दिल है, कितनी बार जीतोगे! ‘त्यांनी’ डिलिव्हरी बॉयला दिले हटके गिफ्ट; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Mom Dress up the dog with a hat and sweater
थंडीपासून संरक्षणासाठी जबरदस्त जुगाड! श्वानाला कानटोपी, स्वेटर घालून केले तयार; पाहा मजेशीर VIDEO
mother shouts at the Pet Dog
आई अशीच ओरडते ना? घरभर केस पडलेले पाहून श्वानाला ओरडली अन्… ; VIDEO पाहून येईल हसू
Viral Video Shows Pet Dog Wants To Ride
‘मम्मी प्लिज मला चढू दे…’ जत्रेत राईडमध्ये बसण्यासाठी श्वानाचा हट्ट, मालकिणीने केला ‘असा’ पूर्ण; पाहा Viral Video

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @beautiful.videos.views या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कुत्रा जेवायला बसला असून त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली आहे. शिवाय यावेळी त्याची मालकीण त्याच्या नाकासमोर चिकन ठेवत आहे, जेणेकरून चिकनच्या वासाने त्याला वाटेल की तो चिकन खातोय, पण प्रत्यक्षात त्याची मालकीण चिकनऐवजी त्याला ब्रोकली खाऊ घालत आहे. हा मजेशीर व्हिडीओ सध्या खूप चर्चेत असून यावर नेटकरी खूप हसत आहेत.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून, त्यावर युजर्सही अनेक गमतीशीर कमेंट्स करताना दिसत आहेत. एकानं लिहिलंय, “मालकीण त्याच्यासोबत चिटिंग करत आहे”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “हे अजिबात हसण्यासारखे नाही”, तर आणखी एकानं लिहिलंय, “किती मोठा धोका आहे हा त्याच्यासोबत.” या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून, अनेक लाइक्सदेखील मिळाल्या आहेत.

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील फोटोवर क्लीक करा

हेही वाचा: बापरे, अजगराची सटकली! पकडायला आलेल्या सर्पमित्राला डसण्याचा प्रयत्न; पुढे जे घडलं ते खूप भयानक, पाहा VIDEO

दरम्यान, यापूर्वीदेखील एका कुत्र्याचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याच्या मालकिणीने चिकनचा तुकडा दाखवल्यावर तो डान्स करत होता, तर आणखी एका व्हायरल व्हिडीओमध्ये कुत्रा चक्क पावसात भिजण्याचा आनंद लुटत असल्याचे दिसत होते. तो व्हिडीओही खूप चर्चेत होता.

Story img Loader