परिस्थितीपुढे हतबल झालेले अनेक जण आपण पाहिले असतील. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होत नसेल तर प्रयत्न करण्याऐवजी बरेच जण शस्त्र टाकून मोकळे होतात. पण याउलट काही जण स्वतःच्या परिश्रमाने परिस्थितीलादेखील गुडघे टेकायला लावतात. जिद्दीने एखादी गोष्ट करायची ठरवली तर आपण काहीही मिळवू शकतो. याचचं एक उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही प्रेरणादायी गोष्ट आहे पंजाबमधील मोहाली येथील एका मुलीची, जिने परिस्थितीपुढे हतबल न होता स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी पाणीपुरी विकण्याचा निर्णय घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या मुलीचे नाव पूनम आहे. पूनम स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी भेळपुरी, पाणीपुरी आणि चाट पदार्थांचा स्टॉल लावलते. काही दिवसांपुर्वी फूड ब्लॉगर हॅरी उप्पल यांनी पूनमच्या स्टॉलला भेट दिली. हॅरी यांनी पूनमला तिच्या या व्यवसायाबद्दल विचारले, तेव्हा तिने याबद्दल अधिक माहिती दिली. अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी तिला या आधीचा जॉब सोडावा लागल्याचे तिने सांगितले. त्यानंतर शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी तिने हा व्यवसाय सुरू केला. ती म्हणाली, “या व्यवसायाबद्दल मी आधी काहीच शिकलेली नाही. मी आता जे काही करत आहे ते सर्व स्वतःहून शिकले आहे. याप्रकारे कष्ट करून पैसे कमवण्यात लाज वाटण्याच काही कारण नाही असे मला वाटते. म्हणून मी हा व्यवसाय करण्याचे ठरवले.”

आणखी वाचा – गर्लफ्रेण्डला प्रपोज करताना खेळाडूच्या पायात क्रॅम्प आला अन्…; Viral Video ची सोशल मीडियावर चर्चा

पूनमचा हा व्हिडीओ फूड ब्लॉगर हॅरी उप्पल यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओला नऊ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज आणि सहा लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. हजारो जणांनी या व्हिडीओवर कमेंट करत पूनमच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. तिच्या परिश्रमाने आणि प्रामाणिकपणाने नेटकऱ्यांची मनं जिंकली. पूनमची ही जिद्द सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video mohali girl sells panipuri to support her education netizens praise her pns
Show comments