सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओंचं व्यासपीठ आहे. रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. वन्यजीवांबद्दल नेटकऱ्यांना कायमच कुतुहूल असतं. वन्य प्राणी कसे जगतात, काय करतात याबाबत उत्सुकता असते. त्यात साप म्हटलं की, उत्सुकता शिगेला पोहोचते. आपण अनेकदा ऐकलं असेल की साप आणि मुंगूस एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. त्यामुळे दोघं एकमेकांसमोर आले तर काय होईल याबाबत मनात प्रश्न निर्माण होतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात एक मुंगूस आणि साप यांच्यातील द्वंद पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओत साप आणि मुंगूस यांच्यात लढत पाहायला मिळत आहे. साधारणपणे, आपण सर्वांनी आपल्या लहानपणी ऐकले असेल की साप आणि मुंगूस एकमेकांसमोर आले की त्यांच्यात लढाई होते. या लढाईत अनेकदा सापाला पराभवाला सामोरे जावे लागते आणि मुंगूस त्याला मारून खातो. व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला जात असलेल्या सापासमोर अचानक एक मुंगूस येतो. मग काय साप आणि मुंगूस यांची झुंज सुरु होते. मुंगूस सापाला वळसा घालू लागतो, तर सापही फणा पसरवून त्याच्याकडे तोंड करताना दिसतो. आपला जीव वाचवण्यासाठी साप मुंगूसावर विषारी दंश मारताना दिसत आहे. चपळ मुंगूल सापाचा वार चुकवत हल्ला करताना दिसतो.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाले असून लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकरी ही लढाई वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. तसेच या व्हिडीओखाली आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video mongoose and snake clash in the forest rmt