Viral Video Today: दारूच्या व्यसनापोटी माणूस माकडासारखा विचित्र वागू लागल्याचे आपणही पाहिले असेल. पण हा दारूचा नाद प्राण्यांनाही सोडत नाही बरं! अलीकडेच सोशल मीडियावर एका दारुड्या माकडाचा व्हिडीओ शेअर झाला होता, अवघ्या काहीच तासात हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. ट्विटरवर ट्रेंडिंग या व्हिडिओमध्ये चक्क एक माकड किंगफिशर बिअरचे कॅन तोंडाला लावून गटागटा दारूचे घोट घेत असल्याचे दिसत आहे. या माकडाच्या व्यसनामुळे परिसरातील दारू विक्रेतेही हैराण झाले आहेत. नेमका हा प्रकार काय आहे? चला तर पाहुयात..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तर झालं असं की, उत्तर प्रदेशातील रायबरेलीतील एका बेवड्या माकडाचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या माकडाने दारूच्या व्यसनामुळे अक्षरशः उच्छाद मांडला आहे. दुकानातून तर हा माकड दारु चोरून पितच होता मात्र आता तर लोकांच्या हातातूनही त्याने बिअरचे कॅन चोरून प्यायला सुरुवात केली आहे. या मद्यपी माकडाविरुद्ध आता दुकानदारांनी पोलिंसाकडे धाव घेतली आहे. प्राप्त माहितीनुसार, श्याम सुंदर या वाईन स्टोअरमधील विक्रेत्याने वानराला पळवून लावण्यासाठी वनविभागाकडे मदत मागितली आहे.

पाहा दारुड्या माकडाचा व्हायरल व्हिडीओ

जेव्हा विराट कोहली म्हणतो ‘मैं नही तो कौन बे’; IND vs PAK सामन्यातील ‘तो’ Video होतोय Viral

दरम्यान, या माकड अनेकदा माणसांची नक्कल करताना दिसतात. अगदी हुबेहूब चालून, हातवारे करून, चिडवून मानव कसा माकडातुनच तयार झाला आहे हे दाखवण्याचा जणूकाही ते प्रयत्नच करत असतात मात्र आता व्यसनांच्या बाबतही माकड माणसाला कॉपी करू लागलं आहे. अशाप्रकारे बिअरचे सेवन माकडाच्या आरोग्यासाठी चांगले नसल्याने वनविभागाकडून याची दखल घेतली जाणे महत्त्वाचे आहे.