Viral Animal Video: असं म्हणतात, संकटात असताना एकवेळ माणूस साथ देत नाही पण प्राणी कधीच एकदा टाकलेला विश्वास तोडत नाहीत. आजवर आपण याची अनेक उदाहरणे सोशल मीडियावर पाहिली असतील. कधी मालकाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणारा पाळीव कुत्रा तर गरोदर महिलेसोबत गोंडस फोटो काढणारा डॉल्फिन असे गोड गोंडस व्हिडीओ सोशल मीडियावर दरदिवशी व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या अनेकांच्या इंस्टाग्राम, व्हॉटसऍप स्टोरीज वर पाहायला मिळत आहे. यात एका रडणाऱ्या व्यक्तीला आधार देण्यासाठी चिंपांझीने केलेल्या कृतीचे खूप कौतुक होत आहे. हा व्हिडीओ बघून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
खरंतर व्हायरल व्हिडीओ मध्ये एक माणूस चिंपांझीजवळ बसून रडण्याचे नाटक करत आहे. मात्र हे बघून चिंपांझीला खरंच ती व्यक्ती दुःखी आहे असे वाटते आणि मग त्याचे सांत्वन करण्यासाठी चिंपांझी पुढे येतो. अगदी प्रेमाने हा चिंपांझी त्या व्यक्तीला मिठी मारतो आणि त्याच्या गालाचे चुंबन घेतो. चिंपाझीची ही गोंडस प्रतिक्रिया पाहून व्हिडीओ मध्ये खोटं रडणारी व्यक्ती खरंच भावुक होते असे दिसतेय. (Video: बैलाला बघून वाघाने केलं असं काही की नेटकऱ्यांना विश्वासच बसत नाही, तुम्हीच पाहा)
पाहा व्हायरल व्हिडीओ
मियामी, फ्लोरिडा, यूएस मधील प्राणीशास्त्रीय वन्यजीव फाउंडेशन (ZWF) येथील हा व्हिडीओ असून इथे अनेक प्रजातींचे चिंपांझी राहतात. यातील लिंबानी नावाचं हे एक माकड खूप प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर लिंबानीचे ७ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. ‘limbanizwf’ या पेजवरून शेअर केलेल्या या व्हिडिओवर 1.8 दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्यूज आणि १ लाख ७४ हजार लाईक्स आहेत.