एका मच्छर म्हणजेच डास माणसाला काय बनवू शकतो हे नाना पाटेकर यांनी खूपआधी सांगितलं आहे. डास जर झोपेत कानाजवळ येऊन आवाज करत असेल तर झोपेचं खोबरं झालंच म्हणून समजा. जेव्हा डास चावतो तेव्हा खाज-पुरळ येते. डासांपासून अनेक गंभीर आजारही होतात. डास तसे आपल्यासाठी नवे नाहीत. विशेषतः पाऊस सुरू होताच डासांचं प्रमाण वाढतं. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया असे आजार होतात. साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होते. या पाण्यात डासांच्या अळ्या असतात असं सांगितलं जातं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पण कधी विचार केला आहे का? की डास नेमकी अंडी कशी घालतात. आता तर थेट व्हिडीओच पाहा. सोशल मीडियावर एका मादा डासाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ही मादा डास अंडी घालताना दिसतो आहे व्हिडीओ पाहूनच तुम्ही थक्क व्हाल.

VIDEO पाहूनच हैराण व्हाल

या व्हिडीओमध्ये डासाची मादी अंडी देताना दिसत आहे. डासाची मादी ज्या पद्धतीने अंडी घालत आहे ते पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. खरं तर डास हे आकाराने फार छोटे असतात. त्यामुळे साध्या डोळ्यांनी डासांना अंडी देताना पाहता येत नाही. कॅमेराच्या माध्यमातून डासांची हलचाल कैद करण्यात आली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. क्लोजअप फिचरच्या माध्यमातून शूट करण्यात आलेला हा व्हिडीओ समोर आला तेव्हा सारेच व्हिडीओ पाहून थक्क झाले.व्हिडीओत पाहू शकता मादा डास आपल्या मागच्या बाजूने एकामागोमाग एक अंडी घालते आहे.तिने बरीच अंडी घातली आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – घर चालवण्याचा १३ वर्षांचा अनुभव! गृहिणीचा CV होतोय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा PHOTO

ही अंडी ती फक्त टाकत जाते असं नाही तर ती एका रांगेत ती लावते आहे. विशेष म्हणजे ही सर्व अंडी ती उभी ठेवते. आपल्या अंड्यांना कोणतंही नुकसान पोहोचू नये आणि त्यातून वेळेत अळ्या बाहेर पडाव्यात यासाठी ती असं करत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी कमेंट्स करुन व्हिडीओ फारच थक्क करणारा असल्याचं म्हटलं आहे. अंडी घातल्यानंतर ती लगेच नष्ट करा असं एकाने म्हटलं आहे. बऱ्याच जणांनी डासांची खरं तर काहीच गरज नाही असं म्हणत त्यांना मारुन टाकणेच अधिक योग्य ठरतं असं म्हटलं आहे.