Viral Video: हल्ली सोशल मीडियावर प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचे मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात कधी कोणी गाणं गाताना दिसतं, तर कधी कोणी अभिनय किंवा डान्स करताना दिसतं. यांपैकी काही व्हिडीओ खूप चर्चेतही येतात; ज्यावर लाखो व्ह्युज आणि लाइक्सही मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात एक आई तिच्या मुलीबरोबर गाणं गाताना दिसत आहे.

सामान्य कुटुंबातील महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी, घराची जबाबदारी या सगळ्या गोष्टींभोवती फिरत असतो. यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला आपले छंद जोपासतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये अशाच एका महिलेचं सुंदर गाणं ऐकायला मिळत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला घरामध्ये “जा रांझन रांझन…”, हे गाणं गाताना दिसत आहेत. यावेळी महिलेबरोबर तिची मुलगीदेखील तिला साथ देते. दोघी मिळून सुंदर आवाजात आणि सुरात हे गाणं गातात, गाणं गायल्यानंतर महिलेचा पती त्या दोघींच्या आवाजाला दाद देतो. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @hardly2060 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला अनेक लाइक्स आणि व्ह्युज मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

एकाने लिहिलंय की, “खूप छान ताई”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “व्वा, मस्तच गायलं दोघींनी.” तर तिसऱ्याने लिहिलंय की, “खूप छान, आवडलं.” तर आणखी एकाने लिहिलंय की, “एक नंबर.”