Mother Daughter Emotional Video : आई आणि तिच्या मुलांशी असलेले नाते फार अतूट असते. या जगात आईसारखं प्रेम दुसरं कोणीच करू शकत नाही. आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. मुलांसाठी कोणाशीही भांडू शकते, कोणत्याही संकटात ती खंबीरपणे उभी असे, आपल्या मुलांना ती कधीही एकटं सोडत नाही. एक आई आपल्या मुलाच्या सुखासाठी स्वतः खूप कष्ट घ्यायला तयार असते. सोशल मीडियावर आई आणि मुलीचा असाच एक हृह्रदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही भावूक व्हाल. हा व्हिडीओ आईसारखं नि:स्वार्थी प्रेम दुसरी कोणीच करू शकत नाही हे दर्शवतोय.
या व्हिडीओत एक आई भरपावसात आपल्या मुलीला खांद्यावर बसवून शाळेत घेऊन जाताना दिसतेय, जे पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक आई आपली लहान मुलगी पावसात भिजू नये म्हणून तिला खांद्यावर घेऊन जात आहे. आईनंही एका हातात छत्री धरली आहे आणि दुसऱ्या हातानं मुलीला खांद्यावर पकडलं आहे. मुलीनं पाठीवर शाळेची बॅगही घेतली आहे. मुलीच्या पायांत शाळेचे पॉलिश शूज आहेत; पण आई अनवाणी पायांनी तिला रस्त्यावरून घेऊन जात आहे. असे असले तरी चेहऱ्यावरचं हसू ठेवीत आई मुलीला खांद्यावर घेऊन रस्त्यानं चालली आहे. असे दिसते की, आई आणि मुलगी दोघेही पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत. आई स्वत: भिजतेय; पण मुलगी भिजू नये म्हणून प्रयत्न करतेय. अशा या परिस्थितीतही आई अगदी आनंदी आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एक्सवर @Gulzar_sahab नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून, त्यावर लोक व्यक्त होत आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, आईने तुम्हाला राजासारखं मोठे केले, आता तिला आयुष्यभर राणी सारखं ठेवा. या व्हिडीओवर लोक खूप कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिले की, आईसाठी तिचा मुलगा नेहमीच राजा असतो. दुसऱ्याने लिहिले की, आईचे प्रेम समुद्रापेक्षा खोल आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटते? आम्हाला कमेंट्स करून कळवा.