Viral Video: जगात मुलांवर आईएवढे प्रेम कोणीही करत नाही. मग ती आई एखादी व्यक्ती असो किंवा प्राणी; आई नेहमीच प्रत्येक गोष्टीत स्वतःआधी आपल्या लेकरांचा विचार करते. स्वतः उपाशी राहून आपल्या मुलांचे पोट भरते. आईच्या तिच्या मुलांवरच्या प्रेमाची एक नाही, तर लाखो उदाहरणे आहेत अशी आहेत की, ज्यातून आईचे मुलांबद्दलचे नि:स्वार्थी प्रेम दिसून येते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात एका आईचे आपल्या लेकराबद्दलचे प्रेम पाहायला मिळत आहे.
आई म्हटली की, तिचा राग अन् नि:स्वार्थी प्रेमही आलच. आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून आई मुलांना सल्ले देते, वेळप्रसंगी त्यांच्यावर रागावते, ओरडते. पण, हीच आई आपल्या बाळाला कधी काही त्रास होऊ नये म्हणून त्याची काळजीदेखील घेते. आई आणि तिच्या मुलांमधील हे खास नाते खूप अनमोल आहे. आई आणि मुलांच्या प्रेमाचे असे अनेक गोड किस्से सोशल मीडियामुळे आपल्या सतत पाहायला मिळत असतात. आता असाच एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही भावूक व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ट्रेनमधून प्रवास करणारी महिला ट्रेन स्टेशनवर थांबली असताना मुलासाठी दूध विकत घेण्यासाठी खाली उतरते; परंतु ती दूध घेऊन येईपर्यंत ट्रेन सुरू होते. ट्रेनमध्ये तिचे बाळ असल्यामुळे ती धावत ट्रेनच्या बाजूला येते आणि रडायला सुरुवात करते. आईची ही तळमळ गार्डच्या लक्षात येताच गार्ड गाडी थांबवतो. गार्डने दाखवलेल्या या माणुसकीचे सोशल मीडियावर अनेक जण कौतुक करीत आहेत.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @lay_bhari_official या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत एक दशलक्षाहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक जण कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
या व्हिडीओवर कमेंट करीत एका युजरने लिहिलेय, “नियम माणसांसाठी असतात; माणसं नियमांसाठी नाहीत हे सिद्ध झालं.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “खरंच खूप सुंदर व्हिडीओ” आणखी एकाने लिहिलेय, “मन जिंकलंस भावा.” आणखी एकाने लिहिलेय, “जगात अजून माणुसकी आहे.”